श्रीरामपुर विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : हरेगाव प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी नाना गलांडे याला अटक करा या मागणीसाठी 11 सप्टेंबर आज गांधी पुतळ्या समोर भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण बसले असता तेथे डी वाय एस पी बसवराज शिवपुजे येऊन आठ दिवसात नाना गलांडे याला अटक करून तुम्ही उपोषण सोडा असे ठोस आश्वासन दिल्यामुळे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी उपोषण स्थगित केले.
यावेळी मगर म्हणाले की महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे दलित समाजातील चार अल्पवयीन तरुणांना कबूतर चोरण्याच्या आरोपावरून अतिशय झाडाला लटकून निर्गुण पणे त्याच्या अंगावर लघवी करून त्याला मारहाण करण्यात आली असा प्रकार महाराष्ट्रातला काळीमा फासणारी अशी घटना घडली आहे तरी या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे तरी आपण मुख्य सूत्रधार आरोपींना नाना गलांडे याला का बर अटक करत नाही? असा प्रश्न संदीप मगर यांनी डी.वाय.एस.पी. बसवराज शिवपुजे यांना केला आरोपी याने जर अटकपूर्व जामीन घेतला तर तो फिर्यादीवर दबाव आणू शकतो कुटुंबांना दबाव आणू शकतो म्हणून त्याला जामीन मिळू नये यासाठी आपण प्रयत्न करावे तसेच फास्टट्रॅक कोर्टात केस चालवावी पिडीत कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे विशेष सरकारी उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली.
यावेळी डी.वाय.एस. पी. डॉ.बसवराज शिवपुजे सांगितले की’ आरोपी नाना गलांडे याचा शोध चालू आहे याला अटकपूर्व जामीन होणार नाही तुम्ही आम्हाला आठ दिवस द्या आम्ही त्याला अटक करू असे ठोस आश्वासन दिले त्यामुळे आम्ही आपल्या आश्वासनामुळे उपोषण स्थगित करत आहोत जर आरोपीला आठ दिवसात आपण अटक नाही केल्यास आम्ही श्रीरामपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर आरोपी नाना गलांडे याला अटक करा या मागणीसाठी भीमशक्ती संघटना व समाजाला बरोबर घेऊन भव्य रस्ता रोको आंदोलन करू असे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी डी.वाय.एस.पी. यांना सांगितले.
यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई पातोरे, महिला उपजिल्हाध्यक्ष विजया बारसे, शहराध्यक्ष अंबादास निकाळजे, उपअध्यक्ष अरुण खंडीझोड,महिला शहराध्यक्ष वंदना गायकवाड, उपशहर अध्यक्ष जयश्री पवार, शहर सरचिटणीस प्रशांत भोसले, शहर संपर्क प्रमुख गौरव बागुल, चंद्रकांत येवले, सनी बारसे, बापू विधाटे, सचिन खाडरे, गुड्डू पंडित, सतीश गायकवाड, प्रदीप थोरात, नितीन त्रिभुवन, राम शेख, सुरज गायकवाड, आकाश जाधव, सचिन कोतकर, ऋषिकेश जाधव, तन्वीर शेख, अनिल गांगुर्डे, सतीश गायकवाड, सुनिता ताई भाकरे, कुणाल वाहुळ, अमन सय्यद, सनी जगताप, दर्शन बारसे, अलोक बार्शी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
डी.वाय.एस.पी.डॉ.बसव राज शिवपुंजे यांचे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन

0Share
Leave a reply