राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षातर्फे प्रत्येक गावात ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. कुठलाही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेणार आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. विविध विकास कामांचा प्रारंभ शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथील स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये विखे बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम आदी उपस्थित हाेते.
खासदार विखे पाटील म्हणाले, ”सत्ता ही विकासासाठी असते, हे सरकारने दाखवून दिले आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील गेल्या ३० वर्षांचा विकास कामाचा अनुशेष आम्ही गेल्या एक वर्षाच्या कालावधीत भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी वर्षभरात मतदार संघाचे रस्ते व विजेचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून तालुक्यातील ६ कोटी ५० लाख रुपये कामांच्या विविधविकास कामांचा प्रारंभ करण्यात आला आहे.
Leave a reply