राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जामखेड तालुक्यातील चौंडी (आहिल्यानगर) येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला अनुसुचित जाती (एसटी) चे आरक्षण लागु करावे या मागणीसाठी चौंडी येथे धनगर समाज बांधाव अमरण उपोषणाला बसलेले असून यावेळी महाराष्ट्रातून विविध सामाजिक संघटना व ज्येष्ठ समाज बांधव हे चौंडी येथे येऊन समाज बांधवाना पाठिंबा देत असून राहुरी येथील धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब बाचकर यांनी चौंडी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच राज्य सरकारने या उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा समाजाला जास्त वेठीस धरू नये असे प्रतिपादन धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आण्णासाहेब बाचकर यांनी केले.
यावेळी धनगर समाजाचे जेष्ठ नेते व उपोषणकर्ते श्री.सुरेश बंडगर, व आण्णासाहेब रुपनर यांची तब्येत खालावली असून या उपोषणाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी श्री. देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंञी श्री.अजित दादा पवार यांचा निरोप घेऊन आलेले नामदार श्री गिरीष महाजन ग्रामविकास मंञी व माजी मंञी प्राध्यपक श्री. राम शिंदे व आमदार श्री. गुट्टे रत्नाकर व ह.भ.प. महाराज पै.श्री. आण्णासाहेब बाचकर जेष्ठ नेते अध्यक्ष महाराष्ट्र धनगर समाज उन्नती मंडळ व श्री.दौलतोडे बाळासाहेब माजी अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ व श्री. अक्षय शिंदे अहिल्यादेवी वंशज व श्री दांगडे मानिकराव, धायगुडे नितीन व जिल्हाधिकारी श्री.सालीमठ व श्री किरण ढालपे, श्री.खरात नंदु, गुलदगड पोपट, भोजने जनार्दन, राम पटारे इत्यादी समस्त धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत निर्णय होतनाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. असा ठाम निर्धार त्यांनी सांगीतला त्यानंतर मंत्री गिरीष महाजन यांनी मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडवणीस यांना फोन लावून उपोषणकर्त्यांचे बोलणे करून दिले व मंत्रिमंडळाची बैठक लावून निर्णय घेण्याचे लेखी आश्वसन द्या व आरक्षण देणार असेल तर किवां लेखी स्वरूपात आम्हांला जोपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असे ठाम पणे या उपोषणकर्त्यांनी यावेळी मंत्र्यांना सांगितले आहे.
Leave a reply