भारत कवितके /मुंबई कांदिवली : कवी चंद्रकांत मोतीराम जोगदंड आयोजित चैत्र पालवी काव्य महोत्सव निमित्त भव्य खुले कवी संमेलन व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कवी लेखक व इतर मान्यवर व्यक्ती ना पुरस्कार जाहीर करण्यात आले त्या वेळी मुंबई कांदिवली येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना त्यांच्या ” माझ्या गावाच्या दिशेने..” या काव्यसंग्रहास महात्मा बसवेश्वर स्मृती काव्य गौरव पुरस्कार साठी निवड झाल्याचे कवी चंद्रकांत मोतीराम जोगदंड यांनी भारत कवितके यांना निवड पत्रा व्दारे कळविले आहे.रविवार दिनांक ५ में २०२४ रोजी एस.एम.जोशी फाऊंडेशन पत्रकार भवन शेजारी गांजवे चौक,नवी पेठ, पुणे या ठिकाणी दुपारी २ ते ६ कवी संमेलन व सायंकाळी ६ ते रात्री ८ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या प्रसंगी मुंबई कांदिवली येथील पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना त्यांच्या माझ्या गावाच्या दिशेने काव्यसंग्रहाला महात्मा बसवेश्वर स्मृती काव्य गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.
भारत कवितके यांच्या या काव्यसंग्रहाला एकूण या पूर्वी तीन पुरस्कार मिळाले असून हा चौथा पुरस्कार आहे.या वेळी प्रतिक्रिया देताना भारत कवितके म्हणाले की,” गाव सोडून मुंबईला नोकरी निमित्त आलो, नोकरी व भाकरी साठी मला आयुष्यभर संघर्ष च करावा लागला,या काव्य संग्रहात तो संघर्ष प्रभावी पणे शब्दातून भारत कवितके यांनी मांडला आहे.संघर्षाशिवाय आयुष्य जगताच आले नाही.व आयुष्य भर संघर्षाची सवयच झाली आहे.” शब्द गंध प्रकाशन संभाजी नगर यांनी प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती संपत आली असून लवकरच दुसरी आवृत्ती काढण्यात येईल.” माझ्या गावाच्या दिशेने..या काव्य संग्रहास पुरस्कार मिळणार असल्याने वाचक वर्गात यांची मागणी होत आहे.
कवी भारत कवितके यांच्या ” माझ्या गावाच्या दिशेने..” काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड

0Share
Leave a reply