Disha Shakti

सामाजिक

कुंटूर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची निवड

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलींद बच्छाव : कुंटूर पोलीस ठाणे अंतर्गत नवीन महिला दक्षता समिती पदाधिकाऱ्याची निवड सदर पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या समितीच्या अध्यक्ष म्हणून रेखाताई अनिल कांबळे यासह परिसरातील सर्व सदस्य म्हणून निवड करण्यात आल्या नंतर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर समितीवर निवड झालेल्या महिलांचा पोलीस ठाण्यामध्ये सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत. यावेळी विशाल बहात्तरे पोलीस निरीक्षक कुंटुर, स.पो.उप.संजय आटकुरे, पोलीस उपनिरीक्षक कुसुमे व सर्व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एकूण 45 गावातील महिलांना समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महिलांना मार्गदर्शन करताना विशाल बहात्तरे, म्हणाले की महिलानी न घाबरता तक्रार करण्यासाठी पुढे यावे पोलिसांना दक्षता समितीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गुन्हेगारी कमी करण्यासाठी एकत्र येऊन काम करता येईल सुशिक्षित महिला पुढे आल्या तर समाजातील इतर महिलांना प्रोत्साहन मिळेल असे मत विशाल बहात्तरे यांनी व्यक्त केले. महिलांना दक्षता समितीच्या माध्यमातून कौटुंबिक वाद आणि कलह समुपदेशन करून अडीअडचणी सोडवण्यासाठी काम केले जाईल असे मत समिती अध्यक्ष रेखाताई कांबळे कुंटुरकर यांनी मांडले.महिला समिती व पोलीस एकत्र मिळून काम केल्यास महिला वरील अत्याचारास प्रमाण कमी होईल असा विश्वासही महिलांनी व्यक्त केला.

यावेळी अध्यक्ष रेखाताई अनिल कांबळे, सोनाली पेदे शेळगाव छत्री, मधुताई काकडे सदस्य कुष्णूर ,अश्विनी जाधव सदस्य सातेगाव, मीरा झगडे सदस्य राजगड नगर, जनाबाई शिंदगे सदस्य बरबडा, रंजना गुंटे सदस्य सोमठाणा, वंदना राक्षसमारे मांडणी, शुभांगी तोडे अंतरगाव, शिल्पा हनुमंते कुंटूर, संगीता मिसाळे सालेगाव, आम्रपाली वाघमारे रुई बु.सुरेखा हेंडगे कहाळा, ललिता पटेकर घुंगराळा व अदी महिला व पोलीस कर्मचारी व पोलीस मित्र यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!