दिशाशक्ती प्रतिनिधी / इनायत आत्तार (श्रीरामपूर) : वडाळा महादेव सेवा संस्था ही माजी आमदार भानुदास मुरकुटे व करण ससाणे यांच्या गटाच्या ताब्यात आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे मुख्य लिपिक आर.एस.जोशी यांचे अध्यक्षतेखाली काल (सोमवारी) संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमन पदासाठी दिलीपराव विश्वनाथ पवार यांच्या नावाची सूचना मंगल अनिल पवार यांनी मांडली, त्यास रोहिदास रंगनाथ कसार यांनी अनुमोदन दिले. या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.जोशी यांनी जाहीर केले.
वडाळामहादेव सोसायटी ही तालुक्यातील अग्रगण्य संस्था असून संस्थेला उत्कृष्ट कामकाजाबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सभासदांना लाभांश वाटणारी सेवा संस्था तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम संस्था म्हणून संस्थेचा तालुक्यात नावलौकीक आहे.या निवडीप्रसंगी कारभारी गायकवाड, रेवन्नाथ गायकवाड, वेडू कसार, नानासाहेब गायकवाड, माणिकराव पवार, भाऊसाहेब पवार, संपतआबा पवार, रावसाहेब उघडे, अशोक कारखान्याचे संचालक रामभाऊ कसार, बाबासाहेब पवार, संस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज गवळी, संचालक बाळासाहेब कसार, धनंजय पवार, रोहिदास कसार, मंगल पवार, सुशिलाबाई उघडे, अनिता कसार, बाबासाहेब अभंग, लक्ष्मण उघडे, बापुसाहेब गायकवाड, राजेंद्र भाकरे, सुनिल कुदळे, बापूसाहेब पवार, शरद मनाजी पवार, महंमद सय्यद, बाळासाहेब उघडे, गजानन कसार, चंद्रकांत पवार, रघुनाथ उघडे, शहाराम राऊत, सचिन पवार, पाराजी गोंदकर, सुदाम पवार, अनिल पवार, सुरेश पवार, विठ्ठल अनारसे, सुनील कसार, रघुनाथ राऊत, बाबासाहेब उघडे, विजय राठोड, ज्ञानदेव भाकरे, भरत पवार, बाबासाहेब शंकर पवार, राजेंद्र गायकवाड,अमोल पवार, अभिजित कदम, प्रकाश राऊत, बालू पवार, मन्नू सय्यद, सुनील राऊत, सागर जगताप, सीताराम कसार, बाळासाहेब दळवी, दिलीप गाढे, सचिव नाईक, एस.एम. कुलकर्णी, दत्तात्रय कसार, संजय राठोड, बबन मुळे, मच्छिंद्र कुसळकर, पांडुरंग सातपुते, कांता राठोड यांचेसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
वडाळा महादेव विविध कार्य.सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी दिलीपराव पवार यांची एकमताने बिनविरोध निवड

0Share
Leave a reply