Disha Shakti

इतर

श्रीरामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीमशक्तीच्या वतीने रस्ता रोको

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी / इनायत आत्तार : महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी घटना अहमदनगर जिल्हात् श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे दलित समाजातील चार मुलांना कबूतर चोरल्याच्या आरोपावरून हरेगाव येथील जातीयवाद युवराज गलांडे व त्याचे प्रमुख मोहरक्या नाना गलांडे यांनी मुलांना त्यांच्या शेतात अमानुषपणे मारहाण करून झाडाला उलटे टांगून त्यांच्या अंगावर लघु शंका केली व बुटावर थुंकून त्या मुलांना बुटावरील थुंकी चाटण्यास लावले.अतिशय भयंकर प्रकार हा घडलेला असून महाराष्ट्राला काळिंबा हसणारी घटना झाली असून झाली असून यातील काही आरोपी अटक झाली असून मुख्य आरोपी नाना गलांडे हा 20 दिवसापासून अद्याप फरार असून त्याला अटक करा या मागणीसाठी भिम शक्ती सामजिक घटनेच्या वतीने दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी गांधी पुतळ्यासमोर समोरअमरण उपोषण बसला होते

त्यावेळी श्रीरामपूर येथील डी वाय.एस पी डॉ.बसवराज शिवपुजे हे उपोषणाच्या ठिकाणी आले असता तुम्ही उपोषण सोडा आम्ही त्याला लवकरात लवकर अटक करू असं ठोस आश्वासन दिले त्यामुळे आम्ही आमचे उपोषण सोडले आता त्या घटनेला आठ ते दहा दिवस उलटूनही गेले तरीपण त्यास तपास लागलेला नाही तपास का लागत नाही जर सर्व आरोपी दोन दिवसात सापडतात तर या मुख्य आरोपीला अटक करीत नाही असा प्रश्न समाजाला पडलेला आहे तरी आपण या घटनेकडे बारकाईने लक्ष देऊन आपण त्या आरोपीला अटक करावी कारण नाना गलांडे यांनी अनेक गोरगरिबांचे जमिनी लाटल्या आहेत त्यांच्या सावकारी धंदा आहे त्यांचे हरेगाव मध्ये दहशत आहे त्याला जर अटकपूर्व जामीन मिळाला तर तो साक्षीदार व फिर्यादीवर व त्यांच्या कुटुंबावर दबाव आणून शकतो त्यामुळे आपण या आरोपीला अटक करून ही केस फास्टट्रॅक कोर्टात अंडर ट्रायल चालवावी व मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच हरेगाव प्रकरणातील कुठलीही आरोपीला जामीन करू नये तसेच विशेष सहकारी वकील नेमण्यात यावा वपीडित कुटुंबांना संरक्षण मिळवावे तसेच नाना गलांडे याला त्वरित अटक करण्यासाठी आमच्या भिम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात उपस्थित असलेले भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर अंबादास निकाळजे शहराध्यक्ष प्रशांत भोसले सरचिटणीस अरुण खंडीजोड विजया बारसे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई बासुरे जिल्हाध्यक्ष तन्वीर शेख सुरज गायकवाड सतीश गायकवाड चंद्रकांत येवले अनिल गांगुर्डे यासीन सय्यद आणि भीमशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!