श्रीरामपूर प्रतिनिधी / राहुल कुंकूलोळ : गेल्या दोन महीन्यापासून बेलापुर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन बंद झाल्यामुळे गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी विरोधी सदस्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले बेलापुर गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईप लाईन चोकअप झाली त्यामुळे गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला ऐन सणासुदीच्या काळात गावाला दोन दिवसाआड पाणी मिळत आहे ते ही वेळेवर मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र खटोड रमेश अमोलीक यांच्यासह बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले प्रसाद खरात प्रकाश जाजु चंद्रकांत नाईक शिरीन भाभी शेख ज्ञानेश्वर कुलथे भुषण चेंगेडीया सुजीत सहानी विजय शेलार प्रमोद बिहाणी गोपी दाणी बाबुलाल पठाण आदिसह गावातील महीलांनी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामविकास अधीकारी मेघशाम गायकवाड यांना विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला त्या वेळी संतप्त महीलांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयास टाळे ठोकले.
आमचा पाणी प्रश्न सोडवा मगच कामकाज करा अशी भुमीका महीलांनी घेतली त्या वेळी पाईप लाईन दुरुस्त होत नाही तो पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करु असे अश्वासन सरपंच साळवी व ग्रामविकास अधीकारी गायकवाड यांनी दिले या वेळी सभापती सुधीर नवले यांनी आपल्याकडे असलेले टँकर गावाकरीता उपलब्ध करुन देवु असे सांगीतले या वेळी रविंद्र खटोड व सुधीर नवले म्हणाले की पाणी टंचाई काळात आम्ही टँकरने गावाला पाणी पुरवले होते आज पाणी असुनही गाव तहानलेले आहे पाणी पुरवठा सुरळीत केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही आता गावाने न्याय कुणाडके मागायचा या वेळी एका महीलेने पाणी पट्टी जमा करुन देखील पाणी पट्टी मागीतली जात आहे असा आरोप केला.