Disha Shakti

इतर

रुईखुर्द कडे जाणाऱ्या एक किलोमीटर रस्त्याची दुरावस्था मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम निकृष्ट असल्याची नागरिकांची तक्रार

Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ मिलींद बच्छाव : कुंटुर परिसरातील मौजे रुई खुर्द ते जय अंबिका सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या एक किलोमीटर अंतर्गत रस्त्यावर एक कोटी 77 लाख रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खर्च करण्यात आले. या रस्त्यावर गेल्या एक वर्षात काम झाले तर नऊ महिन्यांमध्ये सदर रस्तावर ७० खड्डे रस्त्यावर पडले आहेत . सदर रस्ता नागरिकांना चालण्यासाठी कठीण होत आहे . अशी माहिती रुई खुर्द गावातील किशन मोहनराव कानोले ,शकर शिवराम महादवाड, चंपत यादवराव बेलकर नागरिकांनी दिले आहे.

सदर नागरिक व गावातील समस्त सरपंच उपसरपंच व नागरिक वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचेही माहिती यावेळी सांगितले आहे . त्यामुळे गुत्तेदार बी जी भास्करे नांदेड यांनी सदर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनवलेल्या रस्त्याचे काम अरुंद व छोटा रस्ता एम बी ईसटीमेनट ला बगल देत , नाली बांधकाम नाही रस्त्यावर गिट्टी व चांगल्या दर्जा चे तसेच डांभरीकरण ही एक कोटी 77लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या काम नऊ महिन्यात तच उखडून पडले आहे. कुंटुर ते रुई खुर्द कडे जाणाऱ्या एक किलोमीटर अंतर्गत रस्त्यासाठी कोटी रुपये खर्चून करून हि गुतेदार बी जी भास्करे नांदेड यांनी हे काम हाती घेतले.

2021 ला कामाची सुरुवात झाली. 2022 मध्ये काम पूर्ण झाले. 2023 मध्ये नऊ महिन्यात च रस्त्याची अतिशय व्यवस्था बिकट झाली ही चित्र वरिल फोटो मध्ये दिसत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!