राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान सुट्टीसाठी बेलकरवाडी (ताहाराबाद, ता. राहुरी) येथे गावी आला होता. संबंधित जवानाचा मृतदेह गावातील एका तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (वय २३) असे मृत जवानाचे नाव आहे. संबंधित जवानाचा मृतदेह गावातील एका तलावात आढळल्यानंतर त्यास राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन तोडमल यांनी तपासणीला येण्यापूर्वीच जवान मयत झाल्याचे सांगितले. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेबाबतचा नेमका खुलासा झालेला नाही. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी.ए. नागरगोजे हे पुढील तपास करीत आहे. घटनास्थळ पाहणी व सविस्तर चौकशी केल्यानंतरच घटनेचा उलगडा समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Leave a reply