Disha Shakti

इतर

राहुरी बाजार समितीत शेतमालाचे डिजिटल सॉफ्टवेअरचा शुभारंभ

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / नाना जोशी ( राहुरी) : दोन ऑक्टोबर २०२३ कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीचे उपबाजार राहुरी आवार वांबोरी येथे दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती निमित्त अभिवादन करून भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या शुभहस्ते व माननीय श्री एडवोकेट भानुदास सावळेराम नवले, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी यांच्या अध्यक्षतेखाली शेतमालाचे डिजिटल पद्धतीने वजन माप सॉफ्टवेअरचा शुभारंभ केला व सोलर ऑनग्रिड सिस्टीम व सुलभ शौचालयाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला.

त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित बाबासाहेब भिटे,माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अ.नगर, नितीन बाफना, मा.सरपंच ग्रामपंचायत वांबोरी, मच्छिंद्र सोनवणे राहुरी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ ढवळे,माजी सदस्य पंचायत समिती राहुरी, संदिप निकम, सदस्य ग्रामपंचायत कात्रड,बापूशेठ मुथा, अशोक साळुंखे, सुरेशलाल बाफना, मधूकर पवार, गोरक्षनाथ पवार, उपसभापती प्रणाली इंजिनिअर निलेश पाटील, बाळासाहेब खुळे, भाऊसाहेब खेवरे, रामदास बाचकर, सुभाष डुकरे, सचिव व शेतकरी आडत व्यापारी, खरेदीदार व्यापारी, हमाल तोलणार, व्यापारी गाळधारक उपस्थित होते.

सभापती यांनी शेतकरी बांधवांसाठी शेतमालाचे डिजिटल पद्धतीने वजन माप कामकाजाची सविस्तर माहिती दिली व वांबोरी उपबाजार आवार येथे बाजार समितीच्या निवडणूक प्रचार दरम्यान दिलेली आश्वासने निवडणुकीत निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत नवीन संचालक मंडळाच्या मदतीने पूर्ण करीत आहोत. लवकरच वांबोरी उप बाजार आवार येथील उर्वरित काँक्रिटीकरण लवकरात लवकर करत असल्याचे भाषणामध्ये सांगितले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!