शेख युनूस / अहमदनगर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील जांबुत येथील माजी सरपंच आणि साकूर गावचे आदर्श व्यक्तीमत्व असलेले नानासाहेब भागुजी जाधव यांचे वृद्धपकाळाने दुःखद असे निधन झाले. कै. नानासाहेब भागुजी जाधव यांचे पहाटे ३.३० वाजता दुःखद निधन झाले असून त्यांनी आपल्या जीवन प्रवासात अनेक सामाजिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
जांबुत ग्रामपंचायत चे ते सरपंच म्हणून काही काळ कार्यरत होते. मागील दोन वर्षांपूर्वी त्यांचे लहान बंधू ह. भ. प. स्व. भिकाजी महाराज जाधव यांचे हृदय विकारच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. ह.भ.प.भिकाजी जाधव महाराज हे संगमनेर, पारनेर, राहूरी पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार होते. साकूर येथील नाभिक समाजाचे श्री. विजय नानासाहेब जाधव यांचे वडील होते. व राजसत्ता न्यूजचे. संस्थांपक सहदेव जाधव यांचे चुलते होते. नानासाहेब जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Leave a reply