Disha Shakti

इतर

सर्वसामान्यांची सेवा करण्यात मी सदैव प्रयत्नशील राहीन – आ.जितेश अंतापूरकर

Spread the love

देगलूर  प्रतिनिधी / ज्ञानोबा सुरनर :  देगलूर उपजिल्हा रुग्णालयात C.T स्कॅन उपलब्ध झाली असून ते आता तज्ञ डाॅक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली तालूक्यातील सर्व जनतेच्या सेवेसाठी पुर्णवेळ चालू राहणार आहे. दरम्याण नांदेड जिल्ह्यानंतर फक्त देगलूर येथील उपजिल्हा रुग्नालयातच सदरील आधुनिक C.T. स्कॅन मशीन उपलब्ध झाली हे अतिशय आनंददायी बाब आहे. सदरील मशीन हे डी.पी.डी.सी. (जिल्हा नियोजन कार्यक्रम) या माध्यमातून मंजुर झाले आहे. विशेष म्हणजे या मशीन च्या श्रेय वादाच्या लढाई पेक्षा मला सर्वसामान्यांच्या सेवेत सदैव तत्पर राहत काम करण्यात मला आनंद आहे. अशी प्रतिपादन मा. आमदार जितेश अंतापूरकर यांनी दिले.

दरम्याण हे सर्व मा. मूख्यमंत्री आशोकराव चव्हाण यांच्या पूढाकारातून देगलूर उपजिल्हा रुग्णालयात हे आधुनिक सुविधा उपलब्ध झाले असून हे सर्व महाविकास आघडीच्या प्रयत्नाचे फलित असल्याचेही आमदार अंतापूरकर यांनी आवर्जून सांगितले.यावेळी तालूक्यातील सर्व‌ महाविकास आघाडीतील प्रमुख माननीय पदाधिकारी, सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!