Disha Shakti

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या वाळूतस्करांना दोन वर्षांची शिक्षा

Spread the love

प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डंपरमधून वाळूतस्करी सुरू असताना पोलीस पथकाने डंपर पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी पथकाच्या गाडीवर डंंपर घालून मारण्याच्या प्रयत्न केला होता. या प्रकरणातील सहा आरोपींना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक वांबोरीहून राहुरीकडे जात असताना आरोपी त्याचे ताब्यातील डंपर (एमएच 16 एजी 9883) मध्ये 4 ब्रास चोरीची वाळू घेऊन भरधाव जाताना दिसला. तेव्हा पथकाने चालकाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, आरोपीने पोलीस पथकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने डंपर भरधाव चालवून पोलीस पथक बसलेल्या जीपवर घालून त्यांना जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी स्वीप्ट व बोलेरो गाडी मधून पाठीमागून येऊन गैरकायद्याची मंडळी जमा करून पथकातील कर्मचार्‍यांना दमदाटी करत झटापट केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून सरकारी वाहनाचे नुकसान केले होते.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार योगेश भास्कर घोडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राहुरी पोलीस ठाण्याच्यावतीने तपास करून भा.दं.वि. कलम 307, 353, 379, 332, 143, 147, 427, 506, 323 नुसार आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्यासमोर झाली. या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून सदर आरोपींना 353,379, 143, 147, 427, 506, 323 दोषी धरण्यात आले. आरोपींना भा.दं.वि. कलम 307, 332, यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

आरोपी जगन्नाथ रघुनाथ बर्डे (वय 26), रा. हनुमान वाडी, पिंप्री वळण, ता. राहुरी, किशोर कानिफनाथ वारुळे (वय 26), रा. वारुळवाडी, ता.जि. अहमदनगर, सुधीर मुरलीधर दुसुंगे (वय 30), रा. कापुरवाडी, ता.जि. अहमदनगर, सोनल सुभाष निकम (वय 25), रा. वडगाव गुप्ता, ता.जि. अहमदनगर, युसुफ नजीर पठाण (वय 30), रा. तवले नगर, ता.जि. अहमदनगर. प्रमोद बाळासाहेब कराळे (वय 25), रा. वसंत टेकडी, पाईपलाईन रोड, ता.जि. अहमदनगर. या सहा आरोपींना दोन वर्षे शिक्षा व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी स. फौ. विलास साठे व पो. कॉ. योगेश वाघ यांनी सहकार्य केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!