विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण (अहमदनगर) : ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहरी भागाकडे तरुणांचे होणारे स्थलांतर थांबवून ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे टाकळीढोकश्वर येथिल ओम संगणक प्रशिक्षण संस्था संचालित प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे व्हच्युअल ऑनलाईन पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुवारी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र संचालक बापूसाहेब रांधवण यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी अत्यंत कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे तरुणांचा रोजगारासाठी शहरी भागाकडे मोठा ओढा असतो. त्यामुळे शहरांवर त्याचा मोठा ताण येत आहे हे लक्षात घेऊन शहरांवरील ताण थांबविण्यासाठी केंद्र सरकारने ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर ५०० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मान्यता दिली असून टाकळीढोकश्वर येथिल ओम संगणक प्रशिक्षण संस्था संचालित प्रमोद महाजन कौशल्य केंद्राचे आज गुरुवारी सायंकाळी ४ वाजता टाकळीढोकश्वर मध्ये कटारिया मंगल कार्यालयामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हच्युअल ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून या उपक्रमास टाकळीढोकश्वर परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही ओम संगणक प्रशिक्षण संस्थेचे संचालक बापूसाहेब रांधवण यांनी दिली आहे.
Leave a reply