Disha Shakti

क्राईम

कोपरगाव येथे काकानेच केला पुतणीचा कुर्‍हाडीचे वार करत खून ; आरोपी काका पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : दुसर्‍या तरुणाशी का बोलतेस यामुळे राग आलेल्या काकाने विवाहित पुतणीवर कुर्‍हाडीचे वार करत खून केल्याची घटना कोपरगांव शहरातील उपनगर खडकी भागात घडली. आरोपी काका संतोष हरिभाऊ आरणे याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेहा संदीप कांबळे (वय 21) ही अनेक दिवसांपासून माहेरी आई ज्योती नंदकिशोर आरणे यांच्याकडे खडकी भागातील सप्तशृंगी माता मंदिराजवळ राहत होती. बुधवारी रात्री दांडिया खेळून घरी आली व साडेबाराच्या सुमारास ती लघुशंकेसाठी घरा बाहेर आली. तेथेच सौरभ नावाच्या मुलासोबत बोलत होती. यावेळी नेहाचा काका संतोष आरणे तिथे आला. तू दुसर्‍या तरूणासोबत का बोलतेस म्हणून तिच्याशी भांडू लागला. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतोषने नेहाच्या दोन्ही पायांवर सोबत आणलेल्या कुर्‍हाडीने वार केले.

जखमी अवस्थेत नेहाला तिथेच सोडून संतोष आरणे पळून गेला. जखमी नेहाला उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. पंचनामा केल्यानंतर लगेचच शोध घेऊन संतोष आरणे यास अटक केली आहे.

या घटनेबाबत मयत नेहाची आई ज्योती नंदकिशोर आरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष आरणे याच्याविरूद्ध 494/2023 भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत नेहा संदीप कांबळे व तिचा काका संतोष आरणे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. नेहा माहेरी आल्यानंतर ती दुसर्‍याशी बोलल्याचा राग संतोषला आला व त्याने तिचा खून केला. आरोपी पोलीस कोठडीत असून त्याने गुन्ह्यात वापरलेली कुर्‍हाड जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!