अहमदनगर प्रतिनिधी / युनूस शेख : राहूरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील दानशूर आणि सामाजिक कार्येकर्ते (पहिलवान ) रफिकभाई कादर भाई शेख यांनी चिखलठाण येथील कुस्ती खेळाडूंना सुमारे १५ टी. शर्ट हे रफीक शेख कुस्ती संकुल, चिखलठाण वस्ताद संदीप बर्डे या नावाचे टी. शर्ट चे वाटप करून विजेता कुस्ती विरांना बंद पाकिटात भेट रक्कम दिली.
सविस्तर माहिती अशी कि, शेरी चिखलठाण येथील शेख चिकन व मटण आणि व्यापारी रफिकभाई शेख यांना सामाजिक क्षेत्रात अधिक आवड असून ते पहिलवान असल्याने त्यांना कुस्तीचा छंद आहे.रफिकभाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कुस्त्या खेळून नांव लौकिक केले आहे त्यामुळे त्यांनी आपल्या चिखलठाण गावातील तरुण, लहान मुलांना तालीम व्यवस्था सुरळीत करून आपल्या वस्ताद( संदीप बर्डे ) ला तालीम मध्ये कुस्ती चा डाव, अंगमेहनत, जोर, बैठाका आदी व्यायाम करून घेतले जात असून शरीर निरोगी आणि उत्कृष्ट ठेवण्याचा निर्णय ठाम करत त्यांनी तालमीतील १५ कुस्तीवीर मुलांना परिपक्व केले आहे.
रफिकभाई शेख आणि संदीप बर्डे यांनी चिखलठाण येथील युवक आणि लहान मुलांना कुस्ती पटूना शरीर संपदा जपून कुस्ती हागामा हा गावातून नव्हे तर जिल्याहत नांव गाजवले आहे.रफिकभाई शेख यांनी कुस्ती विरांना टी. शर्ट आणि बंद पाकिटात आर्थिक मदत केली असून आपला मदतीचा हात तरुणांच्या पाठीवर ठेवत अभिनंदन व्यक्त केले आहे.
यावेळी उपस्थित कादर भाई शेख, आब्दुल भाई शेख,. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष इसाक सय्यद, आबासाहेब काळनर उप सरपंच दादाभाऊ काळनर, अशोक डोमाळे रॉयल पाटीलचे मालक, शकीलभाई शेख, अल्ताफ शेख, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सादिक भाई, बॉल्डी बिल्डर आदिक ‘डोलनर, बाळासो. ‘डोलनर, बाबासो. ‘डोलनर, नदीम शेख, साहिल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कुस्तीवीर मुस्तकीम शेख, रणवीर डोलनर, आमन सय्यद, ऋतुज डोलनर, राजवीर बर्डे, प्रजित बर्डे, रवी पवार, सुयोग ‘डोलनर, अनिकेत डोलनर, कुणाल ‘डोलनर, ओम काळ नर, जॉन बर्डे, खंडा पवार, आवेज सय्यद, सिद्दीक शेख या कुस्ती विजेताचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्येकर्ते पै. रफिकभाई शेख यांच्यामार्फत कुस्ती खेळाडूंना टी शर्ट व बक्षिसाचे वितरण

0Share
Leave a reply