*शेख युनूस अ. नगर*/..
राहूरी तालुक्यातील पंचक्रोशीत, खेडे वाडी वस्तीवर, गावात अंगणवाडी,आणि बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला भगिनी ह्या सामाजिक आणि उल्लेखनीय कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या ह्या अनमोल कार्याची दखल घेऊन भाऊबीज निमित्त माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त दादा प्रसादराव तनपुरे आणि तनपुरे कुटुंबियांच्या वतीने दिनांक.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी भावाबंध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारत देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी पुढची पिढी सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी अतिशय जिव्हाळ्याने कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीसताई,आशा वर्कर ताई,बचत गटांच्या सी आर पी ताई यांना प्रथम आभार आणि वंदन करण्यात आले.
काही गेली अनेक वर्षांपासून राहूरी तालुक्यातील वाड्या, वस्त्या आणि खेडे गावात महाराष्ट्र शासनाच्या सम्पूर्ण योजना पोहचवून आणि राबवण्याचे कार्य हे अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई, आशा वर्कर ताई, आणि बचत गटाच्या सी आर पी ताई यांनी अविरतपणे केले आहे.
अंगणवाडी, आशा वर्कर यांचे महिला आणि बाल कांच्या सक्षमीकरणासाठी यांचे अनमोल योगदान अमूल्य असल्यामुळे राहूरी तालुक्यातील तमाम माय बाप जनतेची सेवा घडत आहे. कोविड काळात या क्षेत्रातील महिलांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे.
महिलांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी व भाऊबीज निमित्ताने एक छोटीशी भेट देण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या वतीने अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई, आशा वर्कर ताई आणि बचत गटाच्या सी आर पी ताई या सर्व राहूरी तालुक्यातील महिलांना आग्रहाचे आमंत्रण देऊन त्यांचा गुण गौरव तनपुरे कुटूंबायांनी केला.
दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० च्या सुमारास राहूरी शहरातील नगर मनमाड महामार्गावर असलेल्या तनपुरे पाटील स्नेह पूज मंगल कार्यालय येथे भावाबंध हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी उपस्थित राहूरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई, आशा वर्कर ताई, बचत गटाच्या सी आर पी ताई, तसेच उषाताई तनपुरे, सोनाली ताई तनपुरे, वैशाली ताई, आदी महिला भगिनी ताई या मोठ्या संख्येने (१०५१) च्या संख्येने उपस्थित होत्या.
राहूरी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू, उपस्थित होते.
स्नेह भोजनाचा लाभ, स्वाद हा अतिशय आनंदी वातावरणात पार पाडण्यात आला.
अतिशय आनंदी आणि खेळी मेळीच्या वातावरणात भावाबंध हा कार्यक्रम संपन्न झाला.
माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्त दादा तनपुरे आणि तनपुरे कुटुंबियांच्या वतीने राहूरी तालुक्यातील महिलांसाठी भावाबंध कार्यक्रम मोठया थाटामाटात संपन्न*

0Share
Leave a reply