बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली व परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेकांचा घरात पाणी शिरले,नाले तुडुंब भरून वाहत होते. ठिक-ठिक पाणी साचलेले दृश्य पाहाल्याला मिळाले त्यामूळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. तसेच मौजे-मिनकी येथील शिवारात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यात झाडाखाली बांधुन ठेवलेले काळया व करड्या रंगाचा बैलावर विज पडून क्षणांत बैल ठार झाले आहे.
मिनकी येथील शेतकरी गोविंदराव लक्ष्मणराव हजारे यांचे बैल ज्याचे बाजार मुल्य साठ हजार रुपये असुन, दिनांक २५ एप्रिल रोजी अवकाळी पावसात दुपारी ठिक २-३० वा.विज पडुन क्षणांत मृत्युमुखी पडले आहे.शेती उपयोगी बैलाचा विज पडून क्षणांत मृत्युमुखी झाल्यानें गोविंदराव लक्ष्मणराव हजारे या शेतकऱ्यां वर आर्थिक संकट कोसळले असुन, महसुली प्रशासनाकडुन आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे.
सदरील प्रकरणात मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. यावेळी पशुधन अधिकारी अलमवार साहेब यांचे सहकारी डॉ.औराळे साहेब यांच्याकडून पोस्ट मार्टम व पंचनामा करण्यात आला. अजुन काही दिवस अवकाळी पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Leave a reply