Disha Shakti

इतर

आलेगाव दौंड शुगर कारखान्यात दोन कामगारांचा दुर्दैवी मुर्त्यूव…

Spread the love

 

      पुणे प्रतिनिधी :किरण शां. थोरात 

     दौंड (आलेगाव पागा ) येथे रविवारी दौंड शुगर साखर कारकन्यात मोठी दुर्घटना घडली असून, यात दोन तरुण कामगारांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.

     कारखान्यात कामकारणारे कामगार संदिप कुंडलिक गरदाडे (वय 23, रा. पेडगाव ता. दौंड )व गणेश सीताराम शिंदे (वय 23 रा शेडगाव पिसारे, ता. करमाळा. जि. सातारा )मुत्यू झाला आहे. या घटनेबाबत फारुक दुगे यांनी पोलिसांना खबर दिली. कारखान्यातील नवीन प्लँटच्या गरम पाणी असणाऱ्या टाकी लाईनमध्ये संदीप हा फोमवर पाणी मारण्याचे काम करीत होता. येथे काम करत असताना संदीप येथील एका गरम पाण्याच्या टाकीमध्ये पाय घसरुन पडला. त्याला टाकीत पडलेला पाहून खलाशी म्हणुन काम करीत असलेला गणेश शिंदे हा त्यास वाचविण्यासाठी गेला मात्र त्याचा तोल जाऊन तोही त्या टाकीत पडला. ही घटना समजताच तेथील इतर कामगारांनी इतरांच्या मदतीने त्या दोघांना टाकीतून बाहेर काढले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हे दोघेही गरम पाण्यात पडल्याने मयत झाल्याचे दिसुन आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दौंड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दुर्घटनेबाबत दौंड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतिश राऊत करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!