Disha Shakti

इतर

महामार्ग ५१ ला जोडणारा श्रीरामपूर – हरेगाव रस्त्या ची वर्षभराच्या आतच दुर्दशा ;  दिशादर्शक फलक कधी लावणार ?

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशिनकर : अ.नगर तसेच छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांना अगदी जवळून जोडण्यासाठी श्रीरामपूर – वैजापुर या पूर्वीचा राज्यमार्ग 47 व नव्याने महामार्ग 51 ची निर्मिती करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार लहु कानडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. मात्र श्रीरामपूर च्या पुढे ५ ते ६ कि .मी. हरेगाव रस्त्यावर वडाळा महादेव कडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात रस्ता खचला असुन या रस्त्याची तत्पर दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकाकडून होत आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी आ. लहु कानडे यांच्या पाठपुराव्यातुन हरेगाव फाटा ते नाऊर या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून हा जवळ्पास १८ कि.मी. चा रस्ता होऊ शकला. मात्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिरिक्त पाण्यामुळे हा रस्ता खचला असुन यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय या रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याने गेल्या १५ दिवसांपूर्वी दोन चारचाकी वाहनाचे अपघात झाले होते याकडे संबधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार सोयिस्कर दुर्लक्ष करत असुन या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करून रस्त्यावर ठिकठिकाणी वळण रस्ता / दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!