Disha Shakti

राजकीय

जाफराबादच्या सरपंच पदी शारदा शेलार यांची बिनविरोध निवड

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद येथील ग्रामपंचायत निवडणूक 2023-28 मध्ये लागलेल्या निवडणुकीमध्ये जाफराबादच्या सरपंच पदी शारदा संदिप शेलार यांची बिनविरोध निवड झाली आह़े.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शेलार यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून जाफराबाद येथे केलेल्या कामांची विकास कामाची पोच पावती देत व केलेल्या विकासाची दखल घेऊन ग्रामस्थांनी शारदा शेलार यांची सरपंच पदी विनविरोध निवड केली आहे. जाफराबाद ग्रामस्थांच्या सर्वानुमते ग्रामपंचायत निवडणूक 2023 -28 सर्वांच्या एकमताने सरपंच पदाच्या उमेदवार शारदा शेलार यांची बिनविरोध करण्यात आली.

शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले माजी सरपंच संदीप शेलार यांच्या पत्नी शारदा संदीप शेलार यांची सरपंच म्हणून तर प्रभाग एकमधून व बाबासाहेब कारभारी आव्हाड, ज्योती ज्ञानेश्वर नांगळ, विमल रावसाहेब निकम, प्रभाग क्रमांक दोन मधून तबस्सुम सलीम पटेल, कडूबाई सोमा गोलवड प्रभाग क्रमांक तीन मधून सुरैया हाजीमोहम्मद पटेल, संदीप भाऊसाहेब शेलार असे सदस्य मंडळ ग्रामस्थांच्या एकमताने विरोध निवड करण्यात आली आह़े. माजी सरपंच संदीप भाऊसाहेब शेलार यांनी त्यांच्या कार्यकाळात विकासाची अनेक कामे केली या कामाची पावती म्हणून निवड बिनविरोध झाली आहे. ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाला मी पूर्णपणे न्याय देऊन गावाच्या विकासासाठी अतोनात प्रयत्न करीन  अशी ग्वाही त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!