Disha Shakti

सामाजिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Spread the love

अहमदपूर प्रतिनिधी / नंदराज पोले : भारतरत्न बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले.

सुरुवातीला भारतीय बौध्द महासभा तालूका शाखेच्या वतीने सामूहिक त्रीशरण पंचशिल घेण्यात आले. त्यानंतर मान्यवरांची अभिवादन पर मनोगते संपन्न झाली. मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी बोलताना म्हटले की महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानव मुक्तीसाठी केलेले कार्य ऐतिहासिक अशा स्वरूपाचे असून दीन दलित उपेक्षीत समाज घटकांवर त्यांचे अनंत उपकार असून या उपकाराची जाणीव ठेवने गरजेचे आहे असे सांगीतले.

भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील बोलताना म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष होते.त्यांनी इथल्या गोरगरीब लोकांना त्यांचे ह्क्क मिळवून दिले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामूळे आपण सूखी समाधानी जीवन जगत असल्याचे प्रतिपादन केले.या प्रसंगी प्रा.डाॅ.एस.के.खिल्लारे सर, भारतीय बौध्द महासभेचे तालूकाध्यक्ष प्रसाद गायकवाड, साहित्यीक वाय.डी.वाघमारे सर, शेषेराव ससाणे सर आदींनी सूध्दा आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, माजी सभापती अँड.भारत चामे, डाॅ.ओ.एल. किनगांवकर,  बाबासाहेब कांबळे, लक्ष्मीकांत बनसोडे, अण्णाराव सूर्यवंशी, रामनाथ पलमटे,संजय माने,रवी महाजन, डाॅ.शादूल पठाण, अजहर बागवान,पोलिस उपनिरीक्षक दिपक सूर्यवंशी,सूर्यकांत कोकाटे, बालाजी शिंदे,फेरोज शेख, अफरोज शेख यांनी सूध्दा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.दूगाने सर यांनी केले.तर या कार्यक्रमाचे आभार संयोजक तथा पुतळा समीतीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, रिपाई नेते तालूकाध्यक्ष अरूणभाऊ वाघंबर, शाहीर साबळे, संतोष गायकवाड, डॉ.बालाजी थिट्टे ,अजय भालेराव, भिमराव कांबळे, गणेश मुंडे, आदित्य भालेराव,पवन भालेराव, प्रविण गायकवाड, राहुल गायकवाड शिवाजीराव भालेराव आदींनी पुढाकार घेतला. या प्रसंगी विविध पक्षाचे सामाजिक, राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!