नांदगाव प्रतिनिधी /खंडू कोळेकर : नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सरपंच बाळासाहेब सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते काळू पाटील शिंदे उपस्थित होते. तसेच मा.सरपंच भगवान सातपुते, जगन सदगीर, डॉ.अशोक सदगीर, भगवान पांढरे, डॉ.बन्सीलाल सदगीर, शिवाजी निकम, युवा तालुका संघटक वाल्मिक निकम, तसेच भा. ज. पा. जिल्हा सरचिटणीस गणेश शेरमाळे , महादू उशिरे, श्रीमती छबाबाई पवार, लक्ष्मण कोळेकर, भागवत शेरमाळे, तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गावकरी, माजी विद्यार्थी व विद्यार्थी हजर होते.
यावेळी सहावीची विद्यार्थिनी दिव्या कोळेकर व इतर मुलींनी भाषण केले. यावेळी संघर्ष ग्रुप पिंपराळे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वही पेन व बिस्किट वाटप केले .आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याविषयी माजी सरपंच भगवान सातपुते, डॉक्टर अशोक सदगीर व शिवाजी निकम, अजित इंगळे सर यांनी आपल्या भाषणात त्यांच्या कार्याचा उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कमलेश पगार, सुनंदा पाटील ,रत्नमाला बोरसे, नूतन मुलंकर, इत्यादी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कमलेश पगार व आभार प्रदर्शन अजित इंगळे सर यांनी मानले.
नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0Share
Leave a reply