Disha Shakti

Uncategorized

शिलेगाव येथे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे योगिराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज पाद्पर्शाने पवित्र असलेल्या पावनभूमीत या प्रवेशद्वाराचे लोकार्पण सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते संपन्न झाले. राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे कै. चंद्रभागाबाई म्हसे व कै. कोंडाजी म्हसे यांच्या स्मरणार्थ शिवाजीराव बंगाळ व सौ. शोभाताई बंगाळ यांनी स्वखर्चाने शिलेगाव येथे प्रवेशद्वार उभारले असून त्याचे लोकार्पण दि. ३१ डिसेंबर रोजी पार पडले.

यावेळी महंत रामगिरी म्हणाले, गावात प्रवेश करताना वेशीवर उभारलेल्या प्रवेशद्वारामुळे गावाची ओळख निर्माण होते. बंगाळ कुटुंबियांनी स्वखर्चातून हे सत्कार्य केले आहे. येत्या १० फेब्रुवारी पासून शिलेगाव येथे भागवत कथेचे आयोजन करण्याच आले आहे. त्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन चांगले नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उत्तमराव म्हसे, बाळासाहेब जठार, शिलेगावचे उपसरपंच डॉ. पांडुरंग म्हसे, कोंढवडचे सरपंच अर्जुनराव म्हसे, प्रभाकर म्हसे, रविंद्र आढाव, नितीन म्हसे, पोपटराव झुगे, कैलास झुगे, राहुल बंगाळ, नितीन म्हसे, भगवान म्हसे, संजय म्हसे, राजेंद्र म्हसे, बंडू म्हसे ,सुदर्शन म्हसे, सुरेशराव म्हसे, सुभाष म्हसे, मधुकर म्हसे, अशोक देवरे, ज्ञानेश्वर म्हसे, नानासाहेब कोळसे, संतोष देवरे, परशराम कोळसे, गोरक्षनाथ उंडे,पांडुरंग तागड, ज्ञानदेव भांड, विठ्ठल शिंदे, रमेश म्हसे, दादा म्हसे, रवी म्हसे, बबनराव वने, गणेश म्हसे, बाळासाहेब म्हसे, भारत देवरे विनीत माळवदे, विजय माळवदे आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!