विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार (श्रीरामपूर) : दिनांक 30/10/2023 रोजी रात्री 02/30 ते पहाटे 04/00 वा. च्या दरम्यान फिर्यादी प्रफुल्ल बाळकृष्ण ब्रम्हे, वय 71 वर्षे, धंदा- डॉक्टर, रा. काळाराम मंदिराजवळ वार्ड नं.07, श्रीरामपूर जि. अहमदनगर यांचे राहते घरी अज्ञात चोरटयानी तोंडावर रुमाल बांधुन फिर्यादीच्या राहते घराच्या गच्चीवरील लोखंडी खिडकीचे गज कापुन त्यातुन घरात प्रवेश करुन फिर्यादीचे हातपाय बेडशीटने बांधुन व मुलगा डॉ. चिन्मय यांच्या खोलीच्या दरवाज्याची बाहेरुन कडी लावुन फिर्यादीच्या घरातील लोखंडी कपाट कोणत्यातरी हत्याराने वाकवुन कपाट फोडुन कपाटात ठेवलेले 40,00,000/- (चाळीस लाख) रुपये रोख व 7,00,000/- (सात लाख) किं.चा. तनिष्क कंपनीचा सोन्याचा हार 14 तोळे वजनाचा जुवाकिअं असा एकुण 47,00,000/- (सत्तेचाळीस लाख) रु. किंमतीचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय तीन अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इरादयाने चोरुन नेला वगैरेच्या मजकुराच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं. 1159/2023 भादंवि कलम 392, 457, 458, 380, 342, 342, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल होताच मा. पोनि. हर्षवर्धन गवळी सोो. यांनी तात्काळ तपास पथकास बोलावुन सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक हे तात्काळ घटनास्थळी जावुन तांत्रिक विश्लेषणकरुन तसेच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती घेवुन गुन्हयातील गेले मालाचा व आरोपीचा शोध घेत असताना. आरोपीचा कसुन शोध घेत असताना भरपुर आरोपीतांची नावे गुप्त बातमीदारा मार्फत प्राप्त होत होते. त्यातील सर्व आरोपी विषयी तपास पथक हे गोपनीय रित्या माहिती मिळवत होते व त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवुन होते.
बातमीदाराकडुन मिळालेल्या नावापैकी आरोपी नामे 1) जाबीर रशिद शेख, वय 32 वर्षे, रा. रेट्टी ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर, याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली असता, त्यांच्या विषयी गुन्हा घडले पासुन ते आत्तापर्यतची माहिती तपास पथकाने गोपणीय रित्या मिळवुन सदरील आरोपी हा दिनांक 06/01/2023 रोजी त्याच्या गावातील लग्नात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोनि, हर्षवर्धन गळवी साो, यांनी तपास पथकास तात्काळ त्याचे राहते घरी रेट्टी ता. कन्नड, जि. छ. संभाजीनगर येथे पाठवले व तपास पथकाने त्याचे राहते घरी जावुन त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा माझी बहिण नामे 2) हिना राजु सय्यद, वय 38 वर्षे, रा. धंदा- मजुरी, रा. घास गल्ली, वार्ड नं. 06, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर, तसेच माझे इतर दोन साथिदार 3) गौसखाँ हनिफखॉ पठाण उर्फ गौश्या, 4) इरफान इब्राहिम पठाण दोन्ही रा. गराडा, ता. कन्नड, जि.छ. संभाजीनगर असा आम्ही मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन सदर गुन्हयातील गेला मुद्देमाला पैकी खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
डॉ. ब्रम्हे यांचे घरफोडीतील आरोपी बहीण भावास अटक, आरोपींकडून एकुण 19,07000/- रु. किं. मुद्देमाल केला जप्त, श्रीरामपुर शहर पोलीसांची कामगिरी.

0Share
Leave a reply