Disha Shakti

क्राईम

कोळेवाडी येथील विद्यार्थ्यांला मारहाण प्रकरणी शिक्षकाची न्यायालयातून निर्दोष मुक्तता

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी /  युनूस शेख : राहुरी तालूक्यातील कोळेवाडी येथील प्राथमिक शाळेत एक विद्यार्थी वर्गात हसला म्हणून शिक्षकांकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. असा आरोप करून राहुरी पोलिस ठाण्यात शिक्षकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात न्यायालयाकडून आरोपी शिक्षकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. सदर प्राथमिक शाळेमध्ये दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी शाळा चालू असताना दुपारचे सत्रामध्ये सदर विद्यार्थी हा वर्गात हसला. त्याचा राग आला म्हणून व तो शांत बसावा म्हणून आरोपी शिक्षक संजय कपिलेश्वर वायाळ, वय ५३ वर्षे, यांनी त्यास बुक्कीने पाठीत मारहाण केली. हाताने गालावर बोचकारे घेतले. तसेच त्याचे डोके भिंतीवर आपटाविले व तू तुझ्या पप्पाला घेऊन आला तरी त्यांचे समोर तुला मारील, अशी धमकी दिली होती.

या प्रकरणी सदर विद्यार्थ्यांने त्याच्या पालकांसह राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ९७१/२०२३ भादंवि कलम ३२३, ३३७ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकाऱ्यांकडून सदर गुन्हयाचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सदर खटला हा राहुरी येथील महिला न्यायाधिश आर. एस. तपाडीया यांच्या समोर चालला. या दरम्यान सदर खटल्यात साक्षीदार तपासले गेले. आणि दि. ६ जानेवारी २०२४ रोजी सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने आरोपी शिक्षक संजय कपिलेश्वर वायाळ यांची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्यात आरोपी तर्फे जेष्ठ विधीज्ञ व नोटरी पब्लिक ॲड. प्रकाश संसारे यांनी काम पाहिले. सदर खटल्याकडे शिक्षक, पालक वर्गासह सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. न्यायालयाच्या या निर्णयाचे शिक्षक वर्गातून स्वागत होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!