Disha Shakti

Uncategorized

बळीराजा शेतकरी संघटने तर्फे श्रीमती संगीता नाईकरे पाटील राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Spread the love

प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती संगीता नाईकरे पाटील यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीमती संगीता नाईकरे पाटील ह्या घटस्पोटीत, पीडित, विधवा, अत्यंत गरीब महिलांना समाजसेवच्या माध्यमातून न्याय मिळून देण्याचे कार्य करतात.

समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना सत्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळावे व समाजातील लोकांसाठी सुरु असलेले योगदान प्रशसंनीय व कौतुकास्पद असल्याने बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.नितीन बागल सर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, मानचिन्ह व गौरवपत्र देऊन नाईकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ.उमेश देशमुख, रामदास खराडे पाटील, अर्चना पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!