प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील शेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठया थाटामाटात संपन्न करण्यात आला. २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.२६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले.
डॉ.बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान आमलात आणले गेले. संविधानाने कायदा सुव्यवस्था सुरळीत व देशात राहणाऱ्या लोकांची सर्वोच्च शक्ती आणि देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी राजकीय नेते म्हणून त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार फक्त जनतेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अधिकारामुळेच आपण देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आपल्या आवडीचे इतर नेते निवडू शकतो. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की, आपण एकत्र आहोत आणि एकाच भारतीय कुटुंबाचे सदस्य आहोत. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर भारत प्रजासत्ताक बनला.
२६ जानेवारी रोजी परेडचेही आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालय विदयार्थी सामाजिक व सास्कृतीक कार्यक्रम घेतले जातात. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की, आपण एकत्र आहोत आणि एकाच भारतीय कुटुंबाचे सदस्य आहोत याची जाणीव करून देतो.शेरी येथील, अंगणवाडी क्र.६० आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी येथील विद्यार्थी यांनी विविध सांस्कृतिक, गायन, भाषणे, साजरी केली. यावेळी प्रजासत्ताक दिन साजरा करून शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष दिलीप आपासो. काकडे, उपाध्यक्ष गणेश भानुदास काकडे, आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी शालेय विद्यार्थी, पालक आणि गावातील ग्रामस्थ यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त भोजनाचा (अन्नदान ) कार्यक्रम आयोजित केला असता या भोजनाचा आस्वाद समस्थ उपस्थित ग्रामस्थांनी घेतला.
यावेळी प्रमुख उपस्थिती अध्यक्ष मनीषा काकडे, व महिलांना उपाध्यक्ष करत महिलांना प्रथम स्थान देत, गावातील आणि देशातील महिला ह्या कुठल्याही क्षेत्रात मागे न राहता त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देत समाजात समान अधिकाराची जाणीव करत महिलांना प्रथम स्थान देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. संजय काकडे, शेवराज गायकवाड मामा, रोहिदास काकडे, भीमराज काकडे, अरुण पेंडभाजे यांनी तिरंगा फडकाऊन, राष्ट्रगीत, ध्वजगीत सादर करून भारतीय तिरंगेला सलामी दिली.
यावेळी जिल्हा परिषद शाळा शेरी येथील मुख्याध्यपिका आडसूळ मैडम, शिक्षक दुधावडे सर, अंगणवाडी सेविका काकडे मंगल, मदतनीस बिस्मिल्ला शेख, बाळासाहेब काकडे (बाळु तात्या), सारंग काकडे, आपासो. काकडे, पत्रकार युनूस शेख, एकनाथ काकडे, पोपट काकडे, सागर काकडे, राजु माळी, रवी माळी, गजानन काकडे, अंकुश काकडे, साईनाथ काकडे, बबन शिंदे, विकास काकडे, बाळू काकडे, सोपान काकडे,भानुदास काकडे, आदी गावातील ग्रामस्थ आणि महिला युवक पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर सर्व शिक्षक वृद कर्मचारी, महिला पुरुष, तरुण युवकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
Leave a reply