प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : म.वि.प्र संचलित आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल सटाणा येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री. सुनिल दादा सोनवणे हे होते. यावेळी व्यासपीठावर स्कूल कमिटीचे सर्व सदस्य श्री.माधवराव सोनवणे, श्री.बाजीराव सोनवणे, श्री.संजय पवार, श्री.किरण सोनवणे, श्री. सागर अहिरे, पालक, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.वैशाली सोनवणे, श्रीम.अश्विनी महाले, श्रीम. सारिका कदम, श्री.विनय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका हर्षिता अहिरे यांनी केले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. सुनील दादा तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचा गीत मंच व शिक्षक वाघ सर यांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने NCC ची परेड केली. तसेच लेझीम चे विविध प्रकार विद्यार्थिनींच्या पथकाने सादर केले. शाळेत 26 जानेवारी च्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींचे सादरीकरण केले. इ.पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य लढ्यातील विविध घटना मांडल्या. तसेच राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित नृत्य सादर करण्यात आले. शाळेचे स्कूल कमिटी अध्यक्ष मा. सुनील दादा सोनवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना (नर्सरी ते 10 वी.) शैक्षणिक साहित्याची वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. हर्षिता अहिरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीम देवरे प्रियांका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी प्रयत्न केला.
Leave a reply