तेर बातमीदार / विजय कानडे : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव तालुक्यातील तेर येथे तेरणा नदीच्या काठावर असलेल्या श्री संत गोरोबाकाकांच्या समाधीस्थळी अखंड हरिनाम सप्ताहाचे गुरुवार दिनांक 1 ते 8 फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताह कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह भ प सागर महाराज बोराटे , ह भ प अविनाश महाराज भारती,ह भ प पांडुरंग महाराज उगले,ह भ प कबीर महाराज अत्तार, ह भ प निलेश महाराज कोरडे ह भ प महादेव महाराज राऊत , ह भ प संग्राम महाराज भंडारे पाटील यांची कीर्तन सेवा होणार असून काल्याचे किर्तन ह भ प रोहिदास महाराज हांडे यांचे होणार आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय शिवचरित्र व्याख्याते ह भ प श्री रोहिदास महाराज हांडे यांच्या मधुर वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगण्यात येणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताह आयोजक समितीच्या वतीने सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पुणे येथील नामांकित नेत्र रुग्णालय यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर होणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहात नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार असून तेर व तेर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समितीने केले आहे..
Leave a reply