Disha Shakti

इतर

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील जवान संदीप मोहिते यास लेह येथे वीरमरण

Spread the love

नांदगाव (नाशिक) प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील जवान संदीप भाऊसाहेब मोहिते वय 33 यास लेह येथे वीरमरण आले. भारतीय लष्करातील लेह येथील 105 इंजिनियर रेजिमेंटचा जवान संदीप भाऊसाहेब मोहिते येथे कर्तव्यास असताना वीर मरण आले. गावातील लष्करी जवानाला वीरमरण आल्याने मांडवड गाव व संपूर्ण नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. संदीप मोहिते हे मागच्याच महिन्यात सुट्टीवर आलेले होते.

गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी त्यांनी रेजिमेंट जॉईन केली होती. जॉईन झालेल्या पहिल्याच दिवशी बर्फ हटवण्याचे काम करत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचा लहान भाऊ श्रीकांत हा सुद्धा भारतीय लष्करात जयपुर येथे कार्यरत आहे. संदीप यांच्या पाश्चात आई वडील पत्नी दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!