विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 27/12/2023 रोजी रात्री 08 ते 28/12/2023 रोजीचे सकाळी 10 वाजेच्या दरम्यान फिर्यादी बन्सी त्रिबक बर्वे, वय- 68 वर्ष, धंदा- टायर दुकान, रा.इंदिरानगर पाण्याच्या टाकीजवळ, शिरसगांव ता. श्रीरामपूर जि.अहमदनगर यांचे नेवासा ते श्रीरामपुर जाणारे रोडवरील एच.पी. पेट्रोलपंपा जवळ महाकाल टायर्स नावाचे दुकानाचे बंद दरवाजाचे कडी कोयंडा व कुलुप तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने खालील वर्णनाचे सामान चोरुन नेले आहे. चोरीला गेलेले सामानाचे वर्णन खालीन प्रमाणे,
1) 5000/- रु.कि.ची. कॅडी कंपनीची 2 एम.पी.पी. कॉम्प्रेसर वरील मोटार, जुनी, वापरती, किं. अं. 2) 5000/- रु.कि.चे. व्हॅलकेनाझेनेशन (पंक्चर मशिन) बलवंत कंपनीचे जु.वा.कि.अ.
3) 5000/- रु.कि.चे. पंक्चर काढण्याचे साहित्य (व्हील पान्हे, हातोडी, लोखंडी पटया, टायर खोलण्याचे चिमटे, वेल्डींग केबल वायर) जु.वा.कि.अं.
4) 30,000/- रु.कि.चे. हायड्रोलिक जैक (कंपनी माहीत नाही) सहा प्रत्येकी 5000 रु.कि.चे. जु.वा.कि.अं.5) 5000/- रु.किं.चे. ट्रक बोल्ट खोलण्याचे मशिन (कंपनी माहीत नाही) जु.वा.कि.अं.
6) 1000/- रु.कि.चा सिलिंग फैन क्रॉमटन कंपनीचा जु.वा.कि.अं.
7) 2000/- रु. टायर लिव्हीर हातोडी जुवाकिंअ.
8) 3000/- रु. किं. चे व्हिल ट्रक पान्हे जु.वा.कि.अं.56,000/- एकूण
वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल कोणतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला आहे वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 80/2024 भादंवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हा दाखल होताच मा. पोनि. नितीन देशमुख सो. यांनी तपास पथकास सदर गुन्हयातील गेला मुद्देमाल व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेवुन तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे 1) दरर्याब पिंजारी 2) समीर पिंजारी 3) करण खाजेकर, या सर्वानी मिळुन केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक 31/01/2024 रोजी तपास पथकास माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील दोन आरोपी हे एच.पी. पेट्रोलपंप नेवासा रोड येथे उभे आहेत. अशी माहिती मिळाल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी गेले असता तपास पथकास पाहुन दोन इसम पळुन जावु लागले असता तपास पथकाने त्याचा शिताफिने पाठलाग करुन त्याना ताब्यात घेतले व त्याना त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव 1) दर्याब युसुफ पिंजारी, वय 22 वर्ष, रा. आशिवार्दनगर, वार्ड नं. 01, श्रीरामपूर जि. अहमदनगर. 2) समिर शब्बीर पिंजारी, वय 20 वर्ष, रा. भिमनगर, वार्ड नं.06, श्रीरामपूर असे असल्याचे सांगुन सदर गुन्हयाबाबत त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानी सदरचा गुन्हा आम्ही व आमचा साथिदार नामे करण खाजेकर याच्या सोबत मिळुन केल्याची कबुली दिल्याने त्याना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली व त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेला वरील नमुद प्रमाणे Galaxy-Z Fold आला आहे. तसेच यातील आरोपीताकडे इतर गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता यातील आरोपी नामे 1) दर्याब युसुफ पिंजारी, वय 22 वर्ष, रा. आशिवार्दनगर, वार्ड नं. 01, श्रीरामपूर जि. अहमदनगर याने श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं. 108/2024 भादंवि कलम 394 प्रमाणे दाखल गुन्हयाची कबुली दिल्याने त्याच्याकडुन सदर गुन्हयातील नमुद मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1)3000/- रु. कि.रेडमी कंपनीचा मोबाईल जु.वा. किं.अ.
2)3500/- रु रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
6500/- एकुण (गुन्हा नं.108/2024 भादंवि कलम 394 प्रमाणे दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल) वरील वर्णनाचा दोन्ही गुन्हयातील मुद्देमाल आरोपीकडुन राहते घरातुन जप्त करण्यात आला असुन सदरचे दोन्ही गुप्हे तात्काळ उघडकीस आणला आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक/दादाभाई मगरे, परि. पोलीस उपनिरीक्षक/ दिपक मेढे, पाहेकॉ/ रघुवीर खेडकर, पोहेकॉ/ जयवंत तोडमल, पोना/रघुवीर कारखेले, पोना/ प्रशांत बारसे, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकों/ संभाजी खरात, पोकॉ/ अजित पटारे, पोकों/कैलास झिने, पोकॉ/आकाश वाघमारे, पोकॉचा/ बाळासाहेब गिरी तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दरेकर, पोना/सचिन धनाड, पोकों/वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ प्रशांत बारसे हे करीत आहेत
महाकाल टायर्स दुकान फोडीतील व रोड रॉबरीतील आरोपीस 62,500/- रु. किमतीच्या मुद्देमालासह अटक, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

0Share
Leave a reply