राहुरी /शेख युनूस : राहुरी पोलीस स्टेशन गु र न 39/24 भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363, 366 अ अन्वये गुन्हा दाखल असून दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी विश्वास संतोष मकासरे वय 20 वर्ष राहणार संक्रापूर याने लैंगिक अत्याचार तथा तिचे सोबत बेकायदेशीर विवाह करता यावा या उद्देशाने त्याची आई नामे वैशाली संतोष मकासरे वय 45 वर्ष राहणार संक्रापूर पळवून व होमगार्ड आरोपी नेलेले असून त्यास त्याची आई नामे वैशाली संतोष मकासरे वय 45 वर्ष राहणार संक्रापूर हिने सदर आरोपीस तिच्यासोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पळवून नेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुलाची आई-नामे वैशाली संतोष मकासरे वय 45 वर्ष व गुन्हा करण्याकरिता नियोजन, प्रोत्साहन व मदत करणारा होमगार्ड रमेश भास्कर मकासरे, वय 26 वर्ष ,रा चिंचोली फाटा, ता राहुरी यास अटक करण्यात आलेली असून त्याने पीडित मुलीस व आरोपीस सुरुवातीला नांदेड येथे व त्यानंतर धुळे जिल्ह्यात पाठवलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस हवालदार शेळके व नदीम पठाण व तपास पथक पुढील तपास कामी धुळे जिल्ह्यात सावळी येथे पाठवण्यात आलेले होते.
परंतु आरोपीला त्याची कुण कुण लागल्याने तो धुळे जिल्ह्यातून मेहूनबारे येथे पीडीतेसह परागंदा होत असताना सदर पथकाने त्यास ताब्यात घेऊन 10/02/2024 रोजी अटक केली व पीडित मुलीची सुटका करून पोलीस स्टेशन राहुरी येथे आणले. पीडित मुलीस मानसिक आधार देण्यासाठी तिला तिचे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले असून अटक आरोपी यांची मा न्यायालयाकडून दि.14/02/2024 रोजीपर्यंत 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. तदनंतर पीडितेच्या स्टेटमेंट व व वैद्यकीय चाचणी नंतर दाखल गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहिता कलम 376 तसेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्याचे कलम वाढवून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक फडोळ, पोलीस हवालदार शेळके , नदीम शेख, संतोषकुमार राठोड, ढाकणे, यादव, गायकवाड, एएसआय ज्ञानदेव गरजे, पोलीस हवालदार वैराळ पोलीस शिपाई बडे , सानप यांच्या पथकाने केलेली आहे.
अल्पवयीन मुलीस लैंगिक अत्याचार व विवाह करण्याच्या उद्देशाने पळवून नेणाऱ्या मुख्य आरोपीस मेहूनबारे येथून पलायन करताना राहुरी पोलिसांकडून अटक

0Share
Leave a reply