Disha Shakti

सामाजिक

पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या हस्ते पोलीस मित्र संघटनेच्यावतीने ओळखपत्र व नियुक्तीपत्र वितरण सोहळा संपन्न

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / प्रकाश घोगरे : दि.18 फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा खटाव तालुका निमसोड येथे पोलीस मित्र संघटनेचा नियुक्ती पत्र व ओळखपत्र वाटप कार्यक्रम मा.जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वडूज पोलीस स्टेशन यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांनी सर्व महाराष्ट्र राज्यातील व तालुका आणि गाव पातळीवरती संघटना वाढीसाठी सभासद नोंदणी अभियान करून संघटना तळागाळापर्यंत पोहोचावी या सूचनेवरून तालुका गाव पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत याच्यातून खटाव येथे कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख मा.जी.एम.भगत उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे म्हणाले की महिलांनी धाडसाने पुढे येऊन आपल्या समस्या मांडल्या पाहिजे पोलीस मित्र संघटना अतिशय उत्तम प्रकारे कार्य करत आहे. राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी जी.एम.भगत यांनी संघटनेने अत्तापर्यंत काय कार्य केले माहिती महिलांना संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे याबद्दल माहिती दिली. संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला जनसंपर्क प्रमूख मा.विजया कर्णवर यांनी संघटने विषयी माहिती दिली.पश्चिम महाराष्ट्र महिला उपजनसंपर्क प्रमूख मा.पूजा गुरव, अँड.अनुराधा देशमुख, मीनाक्षी पोळ सातारा जिल्हा महिला अध्यक्ष, महेंद्र देशमुख सरपंच निमसोड, राजश्री जाधव खटाव तालुका महिला अध्यक्ष, मा जनार्दन जाधव खटाव तालुका अध्यक्ष यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाला नानासाहेब कारंडे पोलीस हवलदार मायणी, प्रल्हाद जाधव पोलीस पाटील विसापूर, पवन माने पोलीस पाटील नडवळ, सतिश भिसे सरपंच चितळी, राकेश कदम सातारा जिल्हा उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर रेवले सातारा जिल्हा कमीटी सदस्य, नीता देशमुख सीआरपी बचत गटाच्या प्रमुख, विक्रम डोईफोडे सरपंच गोरेगाव, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल नलवडे सोसायटी चेअरमन दत्तात्रेय नलवडे, ( गोरेगाव ) नीताताई देशमुख महिला बचत गट सीआरपी निमसोड , निलेश दादा मोरे, संजय गायकवाड फलटण तालुका प्रसिद्धी प्रमुख, चव्हाण सांगली जिल्हा उपाध्यक्ष, आप्पासाहेब मसुगडे फलटण तालुका कमिटी सदस्य, राहुल पवार फलटण तालुका कमिटी सदस्य, मनोज सरगर फलटण तालुका कमिटी सदस्य, इत्यादी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सर्व खटाव तालुका पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातारा जिल्हा महिला अध्यक्ष मा.मीनाक्षी पोळ यांनी केली तर मान्यवरांचे आभार नंदा जाधव खटाव तालुका महिला उपाध्यक्ष यांनी मानले यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!