विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : दिनांक 11/01/2023 रोजी सायंकाळी 18/00 ते 12/01/2024 रोजी सकाळी 08/00 वा. चे दरम्यान फिर्यादी नामे अमोल रामकृष्ण बोरकर, वय 37 वर्षे, धंदा- शेती, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर यांचे शेतातील तयार आद्रक पिक सुमारे 1 टन वजनाचे व 60,000 रु.किं. चे कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्याचे स्वतःचे आर्थिक फायदयाठी लबाडीच्या ईरादयाने चोरुन नेले आहे वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं.27/2024 भादंवि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल होताच मा. पोनि नितीन देशमुख सो. यांनी तपास पथकास सदर गुन्हयातील गेले मालाचा व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे ऋषीकेश जाधव, रा. सुतगिरणी फाटा, श्रीरामपूर यांने त्याच्या साथिदारासह मिळुन केल्याचे निष्पण झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता गुन्हा दाखल झाले पासुन सदरचा आरोपी हा वारंवार त्याचा ठाव ठिकाणा बदलत असल्याने मिळुन येत नव्हता.
दिनांक 13/02/2024 रोजी सदचा आरोपी हा त्याचे राहते घरी सुतगिरणी फाटा, श्रीरामपूर येथे आला असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर आरोपीस पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला असता त्यास तपास पथकाने शिताफिने पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) ऋषीकेश कैलास जाधव, वय 30 वर्षे, रा. सुतगिरणी फाटा, दत्तनगर, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा माझे दोन साथिदार नामे 2) दिलीप मोहन आढाव वय 52 वर्षे, रा. आगाशेनगर, दत्तनगर श्रीरामपूर 3) किरण संतोष मोरे, वय 19 वर्षे, रा. सुतगिरणी रमानगर, श्रीरामपूर असा आम्ही मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडुन खालील प्रमाणे गुन्हयातील गेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.18,000/- रु. किं. ची. 300 किलो तयार आद्रक,70,000/-रु.कि.ची हिरो कंपनीची एच. एफ. डिलक्स मोटार सायकल नंबर MH 17 CU-4939 असा असलेली सदरचा गुन्हा करताना वापरलेली जु.वा. किं. अं.10,000/- रु.कि.ची एक लक्ष्मी कंपनीची इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार हिरव्या रंगाची, श्रीरामपूर तालुका पो.स्टे गुरनं. 53/2024 भादंवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरी गेलेली जुवाकिअं.98,000/- एकूण, वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल सदर आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीकडे श्रीरामपूर शहर व परिसरात वेळोवेळी चोरी झालेल्या मोटारसायकलबाबत सखोल तपास केला त्यानी आगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यांना अधिक विश्वासात घेवुन मोटार व इतर असता चोऱ्याबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी श्रीरामपूर शहर तसेच अहमदनगर शहर तसेच इतर ठिकाणाहुन हि मोटार सायकल तसेच मोपेड गाडया चोरी केल्याचे कबुली दिली असुन सदर गाड्या चोरतांना आमच्या सोबत
साथिदार नामे 1) दानिश मोहम्मद सय्यद रा. इदगाह मैदान, वार्ड नं.02, श्रीरामपूर 2) गौरव बागुल रा. रमानगर, दत्तनगर श्रीरामपूर, 3) संदीप सुडगे रा. रमानगर, दत्तनगर श्रीरामपूर अशांनी मिळुन केले असल्याची कबुली देवुन सदर चोरी केलेल्या मोटारसायकल या आरोपी नामे दानिश मोहम्मद सय्यद रा. इदगाह मैदान, वार्ड नं.02, श्रीरामपूर हा त्याचे नातेवाईकांच्या मदतीने सदर गाडयाची विक्री करतो. सदरच्या नातेवाईकाबाबत आम्हाला काही एक माहिती नसल्याचे सांगितले,
तपास पथकाने चोरीतील मोटारसायकल नातेवाईकाच्या मदतीने विक्री करणारा दानिश मोहम्मद सय्यद याचा शोध घेत असताना सदरचा आरोपी हा मालेगाव येथे असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने तपास पथक मालेगाव येथे जावुन सदर आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास श्रीरामपूर शहर व अहमदनगर शहर येथे वेळोवेळी मोटारसायकल चोरी केलेल्या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवुन सदरच्या मोटारसायकल या माझे मामा नामे रियाज हुसनौद्दीन शेख, रा. छोटा कब्रस्तान जवळ, आझादनगर, मालेगाव जि. नाशिक यांचे मार्फतीने विक्री करण्यासाठी मालेगाव येथे आलो असल्याची कबुली देवुन त्याने त्याचे मामाच्या राहते घरुन 11 मोटारसायकल काढुन दिल्याने सदर मोटारसायकल जप्त करण्यात आल्या व त्यास नमुद गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली आहे.
1) ऋषीकेश कैलास जाधव, वय 30 वर्षे, रा. सुतगिरणी फाटा, दत्तनगर, श्रीरामपूर. 2) दिलीप मोहन आढाव वय 52 वर्षे, रा. आगाशेनगर, दत्तनगर श्रीरामपूर.
3) किरण संतोष मोरे, वय 19 वर्षे, रा. सुतगिरणी रमानगर, श्रीरामपूर.
4) दानिश मोहम्मद सय्यद रा. इदगाह मैदान, वार्ड नं.02, श्रीरामपूर 5) गौरव बागुल रा. रमानगर, दत्तनगर श्रीरामपूर, (नजरेआड)
6) संदीप सुडगे रा. रमानगर, दत्तनगर श्रीरामपूर, (नजरेआड)
7) रियाज हुसनौद्दीन शेख, रा. छोटा कब्रस्तान जवळ, आझादनगर, मालेगाव जि. नाशिक (नजरेआड)
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि. पोलीस उपनिरीक्षक/ दिपक मेढे, पोहेकॉ/ शफिक शेख पोहेकॉ/ आलम पटेल, पोना/रघुवीर कारखेले, पोना/किशोर औताडे, पोकॉ। राहुल नरवडे, पोकों/ गौतम लगड, पोकों/ रमिझराजा अत्तार, पोकों/ संभाजी खरात, पोकों/अजित पटारे, पोकॉ/ धंनजय वाघमारे, पोकों/अंबादास आंधळे, पोकॉ/ कैलास झिने, पोकों/ अमोल पडोळे, पोकों/ पांडुरग चौधरी, पोकों/ कुलदिप पर्बत, पोकों/आकाश वाघमारे, मपोकों/ मिरा सरग तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/संतोष दरेकर, पोना/ सचिन धनाड, पोना/वेताळ तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय मालेगाव जि. नाशिक येथिल पोलीस अंमलदार भुषण खैरनार, आझाद नगर पोलीस स्टेशन मालेगाव, जि. नाशिक येथिल पोलीस अंमलदार बिपीन ठाकुर यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ रघुवीर कारखेले हे करीत आहेत.
मोटारसायकल गाड्या चोरणारे सराईत आरोपी जेरबंद ; श्रीरामपूरचा भाचा मालेगावच्या मामाच्या मदतीने करायचा विक्री…

0Share
Leave a reply