राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीला आर आर पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आनंदाची बाब असली तरी मात्र या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठे अतिक्रमण आहे. मात्र त्याकडे प्रशासन व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. गावात अनेक मूलभूत प्रश्न आहेत. मात्र हे प्रश्न सोडवण्याऐवजी पुरस्काराचे सत्कार स्विकारण्यातचं धन्यता मानण्याचे धोरण या सर्व पदाधिकारी व प्रशासनाने स्विकारले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
गावातील कमानी पासून गावठाण ते चेचरे वस्ती व नगर मनमाड महामार्गापर्यंत रस्त्याच्या कडेला सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकेरी बाजूनेच वाहतूक सुरू आहे. तर दुसरी बाजू पूर्ण अतिक्रमणाने वेढली आहे. या रस्त्याने जाता येताना नागरिकांना मोठ्या दिव्यातून मार्गक्रमण करावे लागत असून यातून लहानमोठे अपघातही घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या संदर्भात माहिती अधिकारात ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी माहिती अधिकारच स्वीकारण्याचे टाळले त्याचप्रमाणे रजिस्टर पत्रा ने माहिती मागितली असती हे रजिस्टर पत्र घेणे ही त्यांनी टाळले. असल्याचे माहीती अधिकार कार्यकर्त्यांनी सांगितले यावरून हे ग्रामविकास अधिकारी कायद्याचे कीती उल्लंघन करणारा व मुजोरी करतात हे यावरून स्पष्ट होते, प्रशासन अधिकारी ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत मात्र यात वारंवार कसूर करत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत
गावाचा विकास व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकारी निवडून दिले जातात. ग्रामविकास अधिकारी त्यासाठी नेमले जातात. मात्र आपल्याच मर्जीप्रमाणे काम करून दुपारनंतर कार्यालयातून गायब होणारे ग्रामविकास अधिकारी नागरिकांना वेठीस धरत असतील तर न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे
आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळाला ही अभिमानाची बाब आहे. मात्र त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने लोहगाव सुंदर गाव व्हायला हवे अशीच ग्रामस्थांची इच्छा आहे व त्याकडे तरी आता या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. सुंदर गाव पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी आणखी वाढली असून ही जबाबदारी व आपले कर्तव्य पूर्ण करण्याचे काम पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी करावे हीच माफक अपेक्षा ग्रामस्थांची आहे. अन्यथा सुंदर गाव पुरस्कार घेऊन आपला गवागवा करायचा, मात्र दुसरीकडे गावातील अतिक्रमण व विविध समस्या तश्याच ठेवून नागरिकांना एक प्रकारे अंधारात ठेवून आपण खूप काम करतो. हे वरिष्ठ नेत्यांना दाखवायचे हे योग्य नाही. त्यामुळे यापुढे तरी खरोखरच लोहगाव स्वच्छ व सुंदर गाव व्हावे .यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
Leave a reply