तेर प्रतिनिधी / विजय कानडे : सोमवार दिनांक 22 मे रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने तेर मधील भीम नगर व साठे नगर भागातील केशरबाई रणदिवे, बाईसाबाई पेठे परमेश्वर साळुंखे, अमृता रसाळ , जनाबाई पवार यांच्या घरावरील पत्रे उडून जाऊन संसार उपयोगी साहित्याची व अन्न धान्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर तेर मधील अनेक भागात मोठ मोठ्या झाडांच्या फांद्या मोडून विद्युत पोलवर पडल्यामुळे अनेक भागात विद्युत तारा तुटून रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता.
सोमवारी तेर येथे आठवडी बाजार असतो अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने आठवडी बाजारातील व्यापारी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले .आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मंगळवारी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून महसूल व संबंधित अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी तहसीलदार शिवानंद बिडवे, मंडळाधिकारी अनिल तीर्थकर, कृषी सहाय्यक कुमुद मगर, तलाठी प्रशांत देशमुख , ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, उपसरपंच श्रीमंत फंड, राहुल गायकवाड, बबलू मोमीन रविराज चौगुले, संजय लोमटे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply