बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथील सहशिक्षक बरबड्या चे भूमिपुत्र नागोराव मारोती तिप्पलवाड उर्फ एन टी गुरुजी बरबडेकर उपक्रमशील शिक्षक तथा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील गुणवत्तेच्या सार्वत्रिकरणासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नागोराव मारोती तिप्पलवाड यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल एम एस पी चा राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे अध्यक्ष दिपक चामे सर लातूर, उपाध्यक्ष मेघा राणी जोशी, सचिव सतीश कोळी सर, सहसचिव राजश्री पाटील, राज्य समन्वयक रंगनाथ सगर लातूर, जिल्हा समन्वयक प्रमिलाताई शेनकुडे मॅडम श्री पंडित तोटेवाड सर यांनी नुकतेच पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार सोहळा दिनांक 14 मे 2024 रोजी गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक याठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी बरबड्या चे भूमिपुत्र नागोराव मारोती तिप्पलवाड उर्फ एन टी गुरुजी बरबडेकर यांची निवड जाहीर झाली आहे त्यानी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक व रक्तदाना सारख्या पवित्र कार्यात स्वतःला झोकून दिलं त्याची ही पावती आहे एन टी गुरुजी हे विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमा व्यातिरिक कला,क्रीडा, संगीत, वक्तृत्व व शिष्यवृत्ती परिक्षा,नवोदय, डॉ होमी भाभा, गणितं संबोध परिक्षा आणि लहानपणापासून स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात. स्काऊट गाईड च्या माध्यमातून शालेय स्तर ते तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी करून घेऊन विद्यार्थीप्रिय बनले आहेत. त्यानी रक्तदनासारख्या पवित्र अश्या राष्ट्रीय कार्यक्रमात स्वतःला झोकून देऊन अत्यंत दुर्मिळ असा त्यांचा ओ निगेटीव्ह रक्तगट आहे आणि त्यांनी आजपर्यंत 21 वेळा रक्तदान करून अनेक जणांचे प्राण वाचवले. ते स्वतः हार्मोनियम वादक आहेत कविता करणे व वाचन करणे हा त्यांचा छंद आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी,सचिव नारायणराव सर्जे,संचालक व्हि टी सुरेवाड, शिवाजीराव धर्माधिकारी, जगदीशराव धर्माधिकारी, इरंना कंडापल्ले,देविदासराव नेरलेवाड, सहसचिव प्रा सुदर्शनजी धर्माधिकारी, सरपंच माधव कोलगाणे उपसरपंच छायाताई धर्माधिकारी, माजी सरपंच बालाजीराव मदेवाड, बालाजीराव धर्माधिकारी, मुख्याध्यापक शिंदे व्हि आर उपमुख्याध्यापक बडूरे जी पी पर्यवेक्षक फड एस एन, तगडपल्लेवार सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पत्रकार मारोती बारदेवाड,देविदास जेटेवाड,,गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी विद्यार्थी व यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a reply