राहुरी प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील शेरी अंगणवाडी क्र.६० मध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२४ राबविण्यात आले.
५ वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्यात आला. . लहान बालकांना लसीकरण करण्यात आले,दोन थेंब प्रत्येक वेळी पॉलिओवर विजय दरवेळी. भारत पोलिओमुक्त आहे परंतु काही देशात पोलिओ अजूनही असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो, चिमुकल्या ५ वर्षाखालील बालकांच्या संपूर्ण सुरक्षितेची खात्री करून पोलिओ डोस देण्यात आला.यावेळी महिला माता भगिनी, व डॉ. संसारे, अंगणवाडी सेविका सौ. मंगल काकडे, मदतनीस सौ. बिसमिल्ला शेख, आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
Leave a reply