Disha Shakti

सामाजिक

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे – प्रवीण काकडे 

Spread the love

मुंबई कांदिवली  प्रतिनिधी / भारत कवितके :  महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांनी केले ते कुरतडे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने महिला दिनाच्या औचित्य साधून खाण चिरा कामगारांचे महिलांना व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले त्याप्रसंगी ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे होत असून नुकताच भरताना अमृत्व साजरा केला तरी सुद्धा महिलांच्या वरील अत्याचार अन्याय थांबले नाहीत त्यामुळे महिलांनी सर्व प्रकारे चे शिक्षण घेऊन कुटुंबाला घडवणे आवश्यक असून महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळून स्वतः शिक्षणाची कास धरून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षणासाठी गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा आजही महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते अन्यायाला तोंड द्यावे लागते यासाठी स्त्रियांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवावा स्त्री ही अनेक भूमिकेतून जात असते आई मुलगी बहीण मावशी आजी पत्नी या सर्व भूमिका स्त्री निभवत असते.

घरात संस्कार देण्याचे काम स्त्री करते म्हणून समाजात स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी आयुर्वेदिक सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट पुढाकार घेईल स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर मदर तेरेसा रायगडची हिरकणी सुनीता विल्यम्स कल्पना चावला यांचा आदर्श घेऊन स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणावा स्त्रियांनी एकसंघ होऊन समाजातील विषमता नष्ट करावी. विजय गोरे उद्योजक संतोष झोरे समीर आखाडे पांडुरंग बंडगर अमृत गोरे दिशा गोरे साक्षी झोरै रे रोहिणी दोरे वैभव गोयनाक खाणकाम कामगार व महिला उपस्थित होत्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!