राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख : सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल शासनाच्या वतीने दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक श्री.बाबासाहेब शेलार यांना प्रदान करण्यात आला. जमशेटजी भाभा नाट्यगृह, नरिमन पॉइंट , मुंबई येथे भव्य शासकीय सोहळा नुकताच संपन्न झाला.
सदरील पुरस्कार राज्याचे सामाजिक न्याय व क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते पुरस्कार स्विकारताना प्रा.बाबासाहेब शेलार सर, सोबत सौ.स्मिता शेलार, कु.अनुष्का शेलार, श्री. संजयकुमार शिंदे सर , श्री. रवींद्रजी शेलार , यावेळी राज्याचे मुख्य सचिव श्री.भांगे साहेब, बार्टीचे व्यवस्थापकीय संचालक मा.सुनीलजी वारे साहेब अनेक प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. तसेच त्यांना समाज भूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा.बाबासाहेब शेलार यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान.

0Share
Leave a reply