प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : येवला नांदगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकवर कामगारांना सूचना दिलेल्या असताना देखील फाटक वेळेवर न पडल्यामुळे आज शंभराहून अधिक लोकांचे जीव जाता जाता बचावले… नेमकं याला कारणीभूत रेल्वे अधिकारी, कर्मचारी कीं जनता. आज रेल्वे जर थांबली नसती तर कित्येक लोकं मृत्यूमुखी पडले असते.कारण दोन्ही बाजूने रेल्वे येत आहे सर्वांना माहिती असून देखील फाटक पाडलेले नव्हते त्यामुळे आज शंभराहून अधिक लोकंसंख्या रेल्वे ट्रॅक वर फसली होती. सुदैवाने आज अपघात झाला नाही व सर्व जण यामधून सुखरूप बचावली.आजचा या प्रकाराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही रेल्वे अधिकारी यांनी वेळीच पुन्हा नवीन सूचना देणे गरजेचे आहे.असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Leave a reply