राहुरी प्रतिनिधि / ज्ञानेश्वर सुरशे : सद्या डेंगूसदृश्य आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील ग्रामपंचायतकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धूराची फवारणी करण्यात आली आह़े. ब्राम्हणी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई बानकर, उपसरपंच गणेश तारडे, सदस्य महेंद्र तांबे, अरुण बानकर, शांताराम हापसे, अनिल ठुबे, ग्राम विकास अधिकारी माणिक घाडगे यांनी गावातील प्रभाग क्रमांक पाचमधील खळवाडी भागात जावून प्रत्यक्ष पाहणी करून फवारणीचा शुभारंभ केला.
ग्रामपंचायतच्या माध्यमातून खाजगी व्यक्तीमार्फत घरात व परिसरात औषध फवारणी केली जात आहे. या दरम्यान अन्नपदार्थ पिण्याच पाणी व्यवस्थित झाकून ठेवावे असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. औषध फवारणी मोहीम शुभारंभ नंतर सरपंच सुवर्णाताई बानकर व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. खळवाडीतील सांडपाणी व पावसाच्या पाण्याची विल्हेवाट या संदर्भात प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करत या बाबत स्थानिकांचे मते जाणून घेतली.
प्रभाग क्रमांक तीनमधील बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दूरअवस्थेची पाहणी करून त्याबाबत स्थानिकांशी चर्चा केली. दरम्यान रस्त्यावरील दगडे,उकिरडे असे अतिक्रमण व सांडपाणी याची व्यवस्था व बंदोबस्त करावा अशा सूचना संबंधित नागरिकांना ग्रामपंचायत कडून देण्यात आल्या. अतिक्रमित रस्ता खुला करावा. अशी रहिवाशांनी मागणी केली.त्यावर लवकरच निर्णय घेवू असे आश्वासन सरपंच सौ.बानकर यांनी दिले. शनिवारी सरपंच उपसरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत आपल्या दारी हा उपक्रम राबवत नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेत त्यावर सकारात्मक चर्चा केली. गावच्या विकासासाठी प्रभागात फिरताना सदस्यांना सोबत घेऊन विविध अडचणी व समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे सरपंच सौ.सुवर्णा बानकर यांनी यावेळी बोलताना सांगितल.
HomeUncategorizedडेंगूसदृश्य आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता ब्राह्मणी ग्रामपंचायतकडून धूराची फवारणी
Leave a reply