राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : दि.26/03/2024 रोजी अल्पवयीन मुलगी दहावीच्या पेपर नंतर घरी न आल्याने राहुरी पोलीस ठाणे गुरनं. 336/2024 भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्हाचे बाबत गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे व गुन्हाचे तांत्रिक विष्लेशन करुन नमुद गुन्हातील अल्पवयीन मुलगी हीस राहुरी पोलीस स्टेशनचे पथकाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तात्काळ ताब्यात घेतले.
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहमदनगर, मा.वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन,पोहकों/अशोक शिदे,पोहेको/ विकास साळवे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना/ प्रविण बागुल, पोकों/प्रमोद ढाकणे, पोकों/नदीम शेख, पोकॉ सचिन ताजणे,पोको गोवर्धन कदम ,पो का अजिनाथ पाखरे सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर, पो.स्टे. हे करत आहेत. सदर गुन्ह्याबाबत तसेच इतर काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेश नसंपर्क – 8788891147 वर माहिती द्यावी
Leave a reply