Disha Shakti

इतर

भिगवन राशीन रोड झाला मृत्यूचा सापळा, पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : भिगवन राशीन रोड बनला मृत्यूचा सापळा. बारामती राशीन रोड चे जलद गतीने सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे परंतु जुने भिगवन या ठिकाणी व डिकसळ या ठिकाणी खडी अस्ताव्यस्त पडल्याने अपघात होण्याचा धोका जास्त प्रमाणात आहे, त्या ठिकाणावरून वाहन चालवणे खूप धोकादायक झाले आहे, मोटरसायकल चालकांना तर तारेवरची कसरत करावी लागत आहे,

काही वेळा अशी शंका येते की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे. त्या ठिकाणी खडी अस्ताव्यस्त पडलेली आहे तरी लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, सिमेंटचे पाईप अस्ताव्यस्त पडलेले आहेत रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे, तरी पावसाळ्यापूर्वी रस्ता लवकर दुरुस्ती करून घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याच्या इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!