Disha Shakti

राजकीय

कामोठेत आज डॉ.सुजय विखेंच्या उपस्थित संवाद मेळाव्याचे आयोजन, मुंबईतील कामोठ्याचे रणांगण ठरणार कळीचा मुद्दा !!

Spread the love

  विशेष प्रतिनिधी अहमदनगर / वसंत रांधवण : आज रविवारी नवी मुंबईतील कामोठा येथे महायुतीतील भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील अनेकजण नोकरी काम – धांद्यांच्या निमित्ताने या परिसरात स्थायिक झालेले आहेत. मात्र असे असे असले तरी या हजारोंच्या संख्येने असलेल्या नागरिकांची नाळ पारनेरच्या मायभूमीशी पक्की जोडलेली नेहमीच दिसून येते. सहाजिकच सध्या लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असताना कामोठे परिसरातील नागरिक विशेष करून मतदाता हा जिल्ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.

अशातच पारनेर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी तसेच प्रशांत ठाकूर यांनी आज रविवार दि.७ एप्रिल रोजी सायंकाळी भव्य अशा दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास महायुतीचे भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कामोठे परिसरात डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या स्वागताचे मोठमोठाले होर्डिंग्ज – बॅनर अनेक ठिकाणी झळकले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कामोठ्यात होणाऱ्या कार्यक्रमाची मोठी चर्चा नवी मुंबई, कल्याण सह पारनेर तालुक्यात होत असून या कार्यक्रमाकडे अनेकांचे औत्सुक्य पूर्ण लक्ष आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्याकडे देण्यात आले आहे. सायंकाळी एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच त्याच वेळी शाही मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवकालीन वातावरण निर्मितीसाठी हत्ती, घोडे, उंट यासह महाराष्ट्रातील पारंपरिक लेझीम,झांज पथक आदी असणार आहे. यानंतर होणाऱ्या मनोगत कार्यक्रमात अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून अनेक मातब्बर मंडळी या कार्यक्रमास उपस्थिती लावणार असल्याने कामोठ्याचा आज होणारा कार्यक्रम कळीचा मुद्दा ठरणार असे बोलले जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!