Disha Shakti

सामाजिक

प्रा.मनोजकुमार जाधव यांची SCERT पुणे च्या सामाजिक शास्त्रे समन्वयकपदी निवड

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील राहुरी एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय राहुरी, जिल्हा-अहमदनगर येथील इतिहास विषयाचे तज्ञ प्राध्यापक मनोजकुमार जाधव यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(SCERT) अंतर्गत इयत्ता बारावीच्या सामाजिक शास्त्र या विषयाच्या प्रमुख समन्वयकपदी निवड झाली आहे. त्यांची निवड महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत सामाजिक शास्त्र विभागप्रमुख श्री. सचिन चव्हाण सर यांनी निवड झाल्याची घोषणा केली.

ही निवड इयत्ता बारावीच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्रे विषयातील विषयनिहाय आवश्यक साहित्य निर्मिती करणे, बहुविध प्रश्नपेढी व प्रश्नपत्रिका निर्माण करून पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल राहुरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा- सौ. प्रभावतीताई सतीश बिहाणी, सचिव- श्री. मनोजशेठ बिहाणी, सहसचिव- अनुपशेठ बिहाणी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कैलास अनाप सर तसेच शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रा.मनोजकुमार जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!