Disha Shakti

क्राईम

धक्कादायक ! मुंबईत पतीच्या शारिरीक आणि मानसिक जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या, गुन्हा दाखल

Spread the love

मुंबई / गणेश राशीनकर : मुंबईतील मानखुर्द परिसरात पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून २४ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु करून आरोपी पतीला अटक केली आहे. सासरच्या मंडळीकडून तरुणीला हुंड्यासाठी मारहाण केली जायची त्यामुळे तरूणीने आत्महत्या केली असावी असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १० मे रोजी पत्नीने आतून घराचा दरवाजा बंद केला होता. त्यानंतर पती घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना कोणताही प्रतिसाद येत नव्हता. शेवटी घराचा दरवाजा तोडल्यानंतर महिला लटकेलल्या अवस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांना खबर देण्यात आली असता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पतीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

पतीच्या चौकशीतून असं उघड झाले की, महिलेला सासरच्या मंडळीकडून दररोज शिवीगाळ आणि मारहाण केली जायची. यालाच कंटाळून महिलेने आत्महत्या केली. महिलेचे गेल्या वर्षी लग्न झालं होत. लग्नाच्या वेळीस पतीने सोनसाखळीची मागणी केल्याची माहिती आहे. तथापि, आर्थिक संकटामुळे मुलीच्या कुटुंबाने फक्त ५० हजार रुपये रोख आणि इतर वस्तू देऊ शकतात. लग्नानंतर महिला मॅडिकलमध्ये कामाला लागली परंतु तीचा पती सर्व पगार घेऊ लागला. तीला शारिरीक आणि मानसिक छळ करीत असल्याचे दिसून आले.

पतीच्या मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबायाकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी भा.द.वि. कलम ३०४ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पतीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!