अहमदनगर प्रतिनिधी /वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर,ढवळपुरी परिसर तसेच पारनेर तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील होतकरु गरजू युवक-युवतींना सध्या सुरु असलेल्या पोलीस/आर्मी/वनरक्षक भरतीच्या पूर्वतयारीसाठी सुजित झावरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वासुंदे (बोकनकवाडी) येथे देवकृपा फाऊंडेशनच्या वतीने करिअर अकॅडमी तथा मार्गदर्शन केंद्र सुरु शुभारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला असून याठिकाणी सदर स्पर्धा लेखीपरिक्षेसाठी लागणारे ऑनलाईन मार्गदर्शन,सराव पेपर, त्याचप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीचे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे.
सदर मार्गदर्शन केंद्रातील मुला मुलांसाठी शारीरिक चाचणी प्रशिक्षण वेळ – दररोज सकाळी ६ ते ८ वाजता सायंकाळी – ४ ते ६ यावेळी उद्योजक सुरेशशेठ पठारे, सरपंच भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे, दिलीपराव पाटोळे, बाळासाहेब झावरे, चेअरमन नारायण झावरे, रामुशेठ झावरे, लक्ष्मण झावरे, निखिल दाते, सचिन साठे, बन्सी राठोड, दत्तात्रय शिरतार, बाळु गायकवाड, सुनिल साठे, बाळु टोपले, घनश्याम झावरे, भाऊसाहेब झावरे, राहुल कडनर, महेश मलगुंडे, सुनिल मधे, जनार्दन झावरे, बाळु कडनर, शुभम झावरे, शिवप्रसाद टोपले, विशाल मळगुंडे, योगेश भालेकर, गणेश भालेकर, विठ्ठल हिंगडे, गोरख कडनर, वेदांत भालेकर, अमोल राठोड, अलंकार कडनर, संतोष राठोड तसेच वासुंदे व परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
HomeUncategorizedदेवकृपा फाऊंडेशनच्या वतीने पोलिस/आर्मी/वनरक्षक भरतीसाठी देवकृपा करिअर अकॅडमीचा शुभारंभ
देवकृपा फाऊंडेशनच्या वतीने पोलिस/आर्मी/वनरक्षक भरतीसाठी देवकृपा करिअर अकॅडमीचा शुभारंभ

0Share